मध्य रेल्वेच्या विरोधात महा मूक मोर्चा संपन्न!
पुणे : रयत सेवा झोपडी संघटना संलग्न मातोश्री रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी बचाव कृती समितीच्या वतीने मध्य रेल्वेने दिलेल्या नोटीसन विरोधात आज एकजुटीने साडीवाला रोड प्रायव्हेट रोड पत्राचाळ लुंबिनी नगर इनाम नगर या भागातील नागरिकांचा एक भव्य महामुक मोर्चा ताडीवाला रोड विभागात आयोजित करण्यात आला मोर्चाचा समारोप भीमशक्ती चौक पत्राचार या ठिकाणी झाला.
समन्वय समितीच्या वतीने एक जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांना व एक टीम डीआरएम डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर पुणे यांना निवेदन सादर करण्यास गेली असता जिल्हाधिकारी पुणे यांनी सांगितले की येत्या 20 तारखेला समिती बरोबर राज्य शासन रेल्वे प्रशासन व इतर शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करणार आहे. तसेच माननीय डी आर एम रेल्वे यांनी पत्र दुसऱ्या टीमला दिले त्यामध्ये त्यांनी राज्य शासनाबरोबर व चर्चा होऊन अंतिम कार्यक्रम ठरेपर्यंत रेल्वे कोणतीही कारवाई अथवा नोटीस यापुढे झोपड्यांना पाठवणार नाही असे लेखी उत्तर दिले मोर्चामध्ये पुणे शहरातील विविध पक्षीय धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुणे शहरातील मान्यवरांपैकी माजी आमदार रमेश बागवे, आमदार रवींद्रभाऊ धंगेकर, विद्यमान आमदार सुनीलभाऊ कांबळे, माननीय माजी आमदार जयदेवराव गायकवाड, मनसेचे बाबूभाऊ वागस्करवंचित चे मुनवर कुरेशी कुरेशी एडवोकेट अभय छाजेड, एडवोकेट मोहनराव वाडेकर यांच्या सर्व यांच्यासह सर्व माजी नगरसेवक समितीचे सर्व विविधपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम चे सूत्रसंचालन सुजित यादव यांनी केले. व आभार जेष्ठ नेते झेड. बी. जगताप यांनी मानले.
