Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शरद पवार यांना ट्विटर वरून जिवे मारण्याची धमकी

मुंबई : राष्ट्रवादी कोंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटर वरुन  जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासहीत आज मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्या असून त्यांनी हा मुद्दा आयुक्तांकडे मांडला. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘राजकारण महाराष्ट्राचे नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंट शरद पवारांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार आहे,’ असं ट्विट या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. तर सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीने शरद पवार यांच्या आजारावरुन टीका केली आहे.  त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आल्याचे समजते.

पत्रकारांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला व्हॉट्सअपवर हा मेसेज आला आहे. कुठल्या तरी अशी एक धमकी दिली जात आहे. त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्याही अशा काही कमेंट्स आल्या आहेत. या कमेंट्स आक्षेपार्ह आहेत. अशा धमक्या आल्या असतील तर गृहमंत्रालयाने याची तातडीने नोंद घ्यावी. हा विषय मी आज मुंबईच्या पोलिस आयुक्तांपर्यंत कळवला आहे. पवारांबद्दल आलेली धमकी दुर्देवी आहे. राजकारणामध्ये मतभेद नक्की असतात. पण इतका द्वेष पसरवला जातोय, हे फार दुर्देवी आहे, हा द्वेष कसासाठी पसरवला जात आहे. मात्र हा कशासाठी पसरवला जातोय? हे गुंडाराज आहे. असं असेल तर याविरुद्ध तातडीने कारवाई केली पाहिजे अशी माझी मागणी आहे,”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading