औरंगजेबाच्या औलादी कोण(?) हे तपासता येत नसेल तर गृहखाते सांभाळता कशाला..? – गोपाळदादा तिवारी
मुंबई : महाराष्ट्रात गेले काही दिवसां पासून विविध शहरात जाती व धर्म वाचक विद्वेष पसरवणारी व दुही माजवणारी चिथावणीखोर वक्तव्ये जबाबदार सत्ताधारी नेत्यांकडुन पसरवली जात असल्याचे स्पष्ट दिसते आहे. चोरी ते चोरी.. पुन्हा शिरजोरी (?) या तत्वावर राज्य व केंद्रीय पातळीवरील तपास यंत्रणा हाताशी असतांना अशी बायली विधाने करणे राज्याच्या गृहमंत्र्यांना शोभणारे नाही..!
सर्व तपास यंत्रणा हाताशी असुन देखील.. औरंगजेबाच्या औलादी कोण(?) हे देखील साधे तपासता येत नसेल.. तर अशा अपयशी व अकार्यक्षम माणसाने गृहखाते सांभाळावे कशाला..?
असा संतप्त सवाल – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला..!
राज्यातील जनतेस दंगलीं पासुन सुरक्षा देऊ न शकणाऱ्या भेकड व अकार्यक्षम सरकारवर गेल्याच महीन्यात ‘दंगली नियंत्रणाबाबत’ सर्वोच्च न्यायालयाने नपुसंक म्हणुन ऊपमा देऊन, संतप्त ताशेरे ओढले.. ती ऊपमा शिंदे_फडणवीस सरकार सार्थ असल्याचे दर्शवत आहे.. अशी पुस्ती ही त्यांनी जोडली..!
लोकशाहीचा ४था स्तंभ समजल्या जाणाऱ्या देशाप्रती समर्पित प्रशासनाने देखील सत्ताधाऱ्यांच्या गैरकृत्यांना बळी न पडण्याचे आवाहन करीत, IAS & IPS अधिकारी प्रशासनाने सेवेत रुजू होतांना घेतलेल्या शपथेचे स्मरण ठेवावे असे आवाहन देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
