मोबाईल गेमच्या आडून ब्रेन वॉश; महाराष्ट्रात ४०० जणांचे धर्मांतर?
मुंबई : मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याच ऑनलाईन गेमच्या सहाय्याने महाराष्ट्रात ४०० जणांचे धर्मांतर केल्याचा गौप्यस्फोट गाझियाबाद सहाय्यक पोलिस आयुक्तांनी केला आहे.
ठाण्यातील मुंब्रा येथील ४०० जणांचे धर्मांतर करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऑनलाईन धर्मांतर करणा-या मुख्य आरोपीने हा गौप्यस्फोट केल्याचे डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितले. मोबाईल गेमच्या आडून ब्रेन वॉश करत धर्मांतर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दुसरा आरोपी शाहनवाज फरार आहे. गाझियाबाद पोलिस शाहनवाजची आई मुमताजचा जबाब मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्याची शक्यता आहे.
मोबाईल गेमच्या नावाखील धर्मांतर करण्याचे प्रकरण उत्तर प्रदेश पोलिसांनी उघड केले. ही एक मोठी टोळी असून ती ऑनलाईन गेम खेळणा-या मुलांना हेरते. सुरुवातीला या खेळात या मुलांना हरवले जाते, मग त्यात फसवले जाते आणि पुढे त्यांचा धर्मांतराच्या उद्देशाने ब्रेन वॉश केला जातो. ही मुलं ऑनलाईन गेमच्या माध्यमातून डर्टी धर्मांतराचे शिकार होतात.
दिल्लीच्या गाझियाबादमध्ये देखील असेच घडले आहे. ऑनलाईन गेमच्या सहाय्याने दोन अल्पवयीन मुलांचे धर्मांतर केले गेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही मुस्लिम मुलं गैर-मुस्लिम नावाने प्रोफाईल बनवून गेम खेळायची. ही टोळी गेम खेळणा-यांना हरवून त्यांना कुराण पठण करायला लावायची आणि जाणूनबुजून जिंकवायची.
जी मुलं कुराण वाचायची त्यांना धर्मांतर करणा-या टोळीतील सदस्य प्रोत्साहन देण्यासाठी खेळात हरायचे. टोळीतील सदस्य हिंदू आयडी तयार करून कुराणात रस दाखवणा-यांशी गप्पा मारायचे आणि त्यांचा ब्रेन वॉश करायचे. इस्लामिक साहित्य पुरवायचे. मुलांचे ब्रेन वॉश करून त्यांना पैसे देण्याचे आमिष द्यायचे आणि संधी साधत त्यांचे धर्मांतर केले जायचे.
