Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बाळासाहेब देसाईंप्रमाणे मी देखील लवकरच क्रांतिकारक निर्णय घेणार – राहुल नार्वेकर

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आमदार निलंबनाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले असताना मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे. निर्णय आता सांगणार नाही पण मेरिटच्या आधारावर निर्णय देणार असे सूचक वक्तव्य नार्वेकरांनी केले आहे. स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यावरील ‘दौलत’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, बाळासाहेब देसाईंप्रमाणे मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन. आता निर्णय सांगणार नाही पण मेरिटच्या आधारावर निर्णय देणार असेही नार्वेकर यांनी सूचित केले आहे. बाळासाहेब देसाई यांच्या निर्णय क्षमतेबाबत भाष्य करताना नार्वेकर यांनी हे वक्तव्य केले.

राहुल नार्वेकर पुढे म्हणाले की, १९७७ साली माझा जन्म झाला आणि याच साली स्वर्गीय बाळासाहेब देसाईंवर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. बाळासाहेब देसाईंनी ज्याप्रमाणे अनेक क्रांतिकारी निर्णय आपल्या राजकीय आयुष्यात घेतले, त्यातूनच शिकून कदाचित मीदेखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन.

दरम्यान, स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यावरील ‘दौलत’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त केलेल्या भाषणात नार्वेकर यांनी सत्तासंघर्षाच्या कोर्टाच्या निकालानंतर आमदारांच्या निलंबनाबाबतच्या प्रकरणावर दिलेले हे अप्रत्यक्ष संकेत आहेत. राहुल नार्वेकरांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading