fbpx
Tuesday, September 26, 2023
Latest NewsPUNE

जागतिक पर्यावरणदिनी भारत फोर्जने दिली पर्यावरणाप्रती बांधिलकीला पुष्टी

पुणे आघाडीचा बहुराष्ट्रीय समूह भारत फोर्ज लिमिटेडने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनासाठी आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली. हा कार्यक्रम पुणे कॅन्टोन्मेंट गार्डन येथे पार पडला. यावेळी भारत फोर्ज लिमिटेडच्या वित्त विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. केदार दीक्षित उपस्थित होते. शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी असलेल्या कंपनीच्या बांधिलकीवर त्यांनी भर दिला.

मागील वर्षाच्या कामगिरीवर आधारित भारत फोर्जने या मोहिमेचा एक भाग म्हणून १,००,००० झाडांचे वृक्षारोपण यशस्वीरित्या पार पाडले. प्रत्येक पूर्ण वाढ झालेल्या झाडाकडून वर्षाला अंदाजे ०.०२४ MT कार्बन डायऑक्साइडचे शोषला जातो. आतापर्यंत भारत फोर्जने एकूण १,३५,००० झाडे लावली आहेत.

वृक्षारोपण मोहीम ही भारत फोर्जच्या अधिक हरित आणि अधिक शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. कंपनीने २०३० पर्यंत १०,००,००० झाडे लावण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.

वृक्षारोपण मोहिमेसोबतच भारत फोर्जने स्वयंपाकघरातील सेंद्रिय कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर करण्यासाठी एक उल्लेखनीय उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या वर्षीकंपनीने घरांमध्ये ५०० हून अधिक कंपोस्टर प्लांटर्स (CPS) यशस्वीरित्या बसविले. त्यामुळे दररोज सुमारे ७५० ग्रॅम सेंद्रिय कचऱ्याचे पोषक तत्वांनी युक्त खतामध्ये रूपांतर करता आले. या यशाच्या जोरावरभारत फोर्जने यावर्षी आणखी ५०० सीपीज बसविण्याची योजना आखली आहे. एकत्रितपणेहे सीपीज दैनंदिन अंदाजे ७५० किलोग्रॅम सेंद्रिय कचऱ्याचे उच्च-गुणवत्तेच्या खतामध्ये प्रभावीपणे रूपांतरित करतील आणि पर्यावरणावरील प्रभाव कमी करून चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देतील.

भारत फोर्ज लिमिटेडची वृक्षारोपण मोहीम आणि कचऱ्यापासून खतापर्यंतचा उपक्रम यातून कंपनीची पर्यावरणाप्रती कामाची बांधिलकी आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्यातली मोलाची  भूमिका याचे दर्शन घडते. पर्यावरण आणि समाजाच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान देणाऱ्या जबाबदार व्यवसाय पद्धतींमध्ये सहभागी होण्यासाठी कंपनी वचनबद्ध आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: