निसर्गाला जपणे ही भगवंताची श्रेष्ठ पूजा राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे प्रतिपादन
पुणे : श्रावणात महादेवाला १ लाख बेलाची पाने वाहणे, ही एक शिवाची पूजा सांगण्यात येते. जेव्हा बेलाच्या पानांची उपलब्धी होती तेव्हा संख्येचा आग्रह होता. परंतु काळानुसार व्रतांचे स्वरूप बदलायला हवे. १ लाख बेलांची पाने वाहीन यापेक्षा एक बेलाचे झाड लावीन आणि ते जगवेल हे असा विचार असायला हवा. निसर्गाला जपणे ही भगवंताची श्रेष्ठ पूजा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.
संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक सोहळा, जिजाऊंचा शिवबा, माझ्या नजरेतून दिसणारे शिवाजी महाराज अशा विविध विषयांवर ७ ते १५ वयोगटातील मुला-मुलींनी निबंध मराठी व इंग्रजी भाषेत लिहिले आहेत. निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी झाला.
चारुदत्त आफळे म्हणाले, निसर्गाच्या संवर्धनाचा विचार करुन निसर्गाच्या संगोपनाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. आध्यात्मिक प्रगतीसाठी निसर्ग उपयुक्त आहे. मनाशी संवाद साधण्यासाठी निसर्गाची गरज आहे. गायींचे रक्षण आणि गायीची उपयुक्तता देखील त्यांनी यावेळी सांगितली. गाईंच्या संहारासाठी दुष्ट उभे रहात असतील तर शिवरायांचे पाईक होऊन गाईंचे रक्षण करा, असे आवाहन त्यांनी केले.
