Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवरायांना मानवंदना

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त एस एस पी एम एस ग्राउंड शिवाजीनगर येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षे पूर्ण होत आहेत या निमित्ताने राज्यभर राज्याभिषेक दिन अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा होत असताना अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर शाखेच्या वतीने विविध उपक्रम राबवून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आले यावेळी ममता फाउंडेशन अनाथ आश्रम गुजरवाडी या ठिकाणी अनाथ निराधार व्यक्तींना व बालकांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले..

या कार्यक्रमांचे नियोजन मराठा महासंघाचे पुणे शहर कार्याध्यक्ष अमर पवार आणि पुणे शहर संघटक राकेश रेपाळे यांनी केले
याप्रसंगी शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष अमितदादा गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष नाना निवंगुणे, जेष्ठ सभासद दत्तात्रय शिंदे, सर्वश्री पुणे उपाध्यक्ष सुशिल पवार, संतोष राजगुरू, गणेश ठाकर, तानाजी भोसले, युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड, कॅंटोमेंट अध्यक्ष आकाश चव्हाण, भारत वडगावकर , नेताजी निवंगुणे, मच्छिंद्र आवटे सर, सचिन रांजणे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading