द नाईट मॅनेजर 2 चा ट्रेलर लाँच !
डेंजरसली हँडसम शेली रुंगटा म्हणजे अनिल कपूर याचा द नाईट मॅनेजर 2 ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !
द नाईट मॅनेजर 2 च्या ट्रेलरमध्ये अनिल कपूरने जिंकली प्रेक्षकांची मन !
सगळयांना उत्सुकता असलेला ” द नाईट मॅनेजर 2 “चा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिला सीझन संपल्यानंतर आता पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. शस्त्र विक्रेता शेली रुंगटा दुसऱ्या सीझनमध्ये नक्की काय भूमिका घेणार ? काय घडणार या सगळ्यांची उत्तर 30 जून ला बघायला मिळणार आहे. ट्रेलर मधून अनिल कपूर च्या हँडसम लूक चा चर्चा ना उधाण आलं आहे आता हा सीजन लवकर यावा या साठी सगळेच 30 जून ची वाट बघणार आहेत. दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित होताच शेली रुंगटा पहिल्या सीझनपेक्षा अधिक निर्दयी, क्रूर आणि थोडा अजून उत्साहवर्धक दिसणार आहे.
अनिल कपूरने त्याच्या सोशल मीडियावर कॅप्शनसह ट्रेलर पोस्ट केला आहे ” शेली की लंका जलाने के लिए, शान है तैयार ” अस कॅपशन लिहीत मोस्ट अवेटेड सीझन फिनाले येतोय अशी खास पोस्ट त्याने लिहिली आहे.
दुसरा सीजन 30 जून रोजी रिलीज होणार असून अनिल कपूरला निर्दयी शस्त्र विक्रेता म्हणून पाहण्याची उत्सुकता या सीजन मध्ये पूर्वीपेक्षा जास्त असणार आहे. पहिला सीझन मध्ये अनिल कपूर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत आणि आता पुन्हा तो प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी तयार झाला आहे.
द नाईट मॅनेजरमध्ये अनिल आणि आदित्य रॉय कपूर ही सुपरहिट जोडी दिसणार आहे. अनिल कडे रणबीर कपूरसोबत अॅनिमल, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत फायटर, त्यानंतर सुभेदार आणि अँड्रॉइड कुंजप्पन Ver 5.25 चे हिंदी रूपांतर असे अनेक दर्जेदार चित्रपट आहेत.
