Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतर्फे ‘ इनोवेटिव्ह टिचिंग – लर्निंग अँड ट्रेनिंग इन हायर एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट ‘ वरील राष्ट्रीय परिषद संपन्न

पुणे : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयु) तर्फे नुकतेच ‘इनोवेटिव्ह टिचिंग- लर्निंग अँड ट्रेंनिंग इन हायर एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट’ या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद महाराष्ट्रातील पहिले कौशल्य आधारित विद्यापीठ एसएसपीयु आणि देशातील अग्रेसर दूरस्थ शिक्षण देणारे सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (एसीसीडीएल) यांच्या सहयोगाने एसएसपीयुच्या मुख्य सभागृहात पार पडली. ह्या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट शैक्षणिक क्षेत्रात उच्च-गुणवत्तेचे शिक्षण आणि नवीनतम अध्यापन पद्धतींना चालना देणे असे होते.

या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. श्यामल मजुमदार, माजी संचालक, युनेस्को, युनिव्होक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री. वेस्ली टेटर, वरिष्ठ सल्लागार, एज्युकेशनल इंनोव्हेशन अँड स्किल डेव्हलोपमेंट, युनेस्को, बँकॉक – आशिया पॅसिफिक रिजिनल ब्युरो ऑफ एजुकेशन,आणि श्री मनीष जोशी, प्रकल्प अधिकारी,युनेस्को, युनिव्होक, जर्मनी ह्या प्रमुख वक्त्यांनी उपस्थितांना ऑनलाईन पद्धतीने उपस्थितांना मार्गदर्शन केले. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिरूरकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात या राष्ट्रीय परिषदेची माहिती दिली.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी उद्घाटनपर भाषणात म्हणाल्या की ,” भारत आज ज्या वळणावर आहे त्या क्षणी कौशल्य भारत मिशन आणि मेक इन इंडिया मिशन हे अत्यंत महत्वाचे आहेत .भारताची अधिकाधिक लोकसंख्या ही तरुण वर्गाची असून ही भारतासाठी बिशेष बाब आहे. मात्र ह्या लोकसंख्येला जर कौशल्य विकासाकडे वळवले नाही तर लोकसंख्याशास्त्रीय लाभांश देखील लोकसंख्याशास्त्रीय आपत्ती बनू शकते. शिक्षकांनी कौशल्यशिक्षणाचे महत्व समजून घेऊन विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण रोजगारक्षम बनवले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना रोजगार निर्मिती सुद्धा प्रोत्साहन दिले पाहिजे.

” डॉ. स्वाती मुजुमदार यांनी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी बद्दल माहिती देताना सांगितले की, आमच्या विद्यापीठतील जवळपास ३० टक्के विद्यार्थी हे स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप चालू करतात ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानासब्द बाब आहे.

ह्या परिषदेचे प्रमुख पाहुणे डॉ. श्यामल मजुमदार, माजी संचालक, युनेस्को, युनिव्होक म्हणाले की बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षकांसाठी काही मानके स्थापित करण्याची गरज आहे. त्याअंतर्गत शिक्षकांचे पुनर्प्रशिक्षण, व्यवस्थापन व नेतृत्वगुण प्रस्थापित करणे गरजेचे आहे. तसेच मानके स्थापित करण्यासाठीच्या प्रक्रियेतील महत्वाचे घटक जसे उद्योगांशी संपर्क व इतर संसाधने आवश्यक ह्या बद्दल सविस्तर माहिती दिली तसेच हे महत्वाचे घटक आधीपासूनच एसएसपीयु ने अमलात आणल्याचे सांगून विद्यापीठाचे कौतुक केले.

सदरील परिषद ही ‘इनोव्हेटिव्ह टीचिंग अँड लर्निंग थ्रू टेक्नॉलॉजी या संकल्पनेवर आधारित होती. यामार्फत उपस्थितांना शैक्षणिक क्षेत्रात नव्याने उदयास येत असलेल्या संकल्पनांबाबत मार्गदर्शन मिळाले. ह्या परिषदेमध्ये अध्यापन-शिक्षण तंत्रज्ञानामध्ये ऑनलाइन संसाधनांचा वापर कसा करावा,व्हर्च्युअल क्लासेस कसे आयोजित करावे, शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये आयसीटी साधनांचा वापर कसा करावा, मुक्त शैक्षणिक संसाधने अशा विविध विषयांवर चर्चासत्रे घडून आली. ह्या परिषदेच्या माध्यमातून उपस्थितांना नेटवर्किंग, उद्योग क्षेत्रातील तज्ञांना भेटण्याची, कल्पनांची देवाणघेवाण करण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी प्राप्त झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading