Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

अक्षय भालेराव च्या मारेकऱ्यांना फाशी द्या – रिपब्लिकन सेना

पुणे : नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (भारत सरकार) चे सदस्य सुभाष पारधी यांची रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे ,जिल्हाप्रमुख विशाल म्हस्के ,रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांनी भेट घेतली. यावेळी अक्षय भालेराव च्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी कमलेश चाबुकस्वार,  कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ संघ अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, निलेश गायकवाड, भिम आर्मी एकता मिशन अध्यक्ष दत्ताभाऊ पोळ, निता अडसूळ, अतुल साळवे, गमिनी कावा संघटनेचे संजय वाघमारे आदींनी देखील भेट घेऊन कारवाईची मागणी केली.
नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव चे हत्याकांड हे पूर्वनियोजित असून केवळ जातीयद्वेषापोटी अक्षयची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आरोपींच्या मागे राजकीय पाठबळ असल्याने पुरावे लपवणे, साक्षीदारांवर दबाब आणण्याची शक्यता असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading