fbpx
Friday, April 19, 2024
BusinessLatest News

अर्जुन कपूर यांच्या हस्ते जगातील पहिली फ्रँचाईझी सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग लाँच

दिल्ली :  मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात मोठी क्रांती येत असून बॉलिवूड अभिनेते आणि सुपरक्रॉसचा चाहते असलेल्या अर्जुन कपूर यांनी सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे अनावरण केले. या लीगचे फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या (एफएमएससीआय) सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे. ही लीग फ्रँचाईझी पद्धतीची पहिली सुपरक्रॉस रेसिंग लीग असून त्यामध्ये जगभरातील रायडर्स वेगवेगळे फॉरमॅट्स आणि विभागात खेळतील.

सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (आयएसआरएस) मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यायासाठी सज्ज आहे. सीएट आयएसआरएसची टायटल प्रायोजक, तर टोयोटा हिलक्स अधिकृत वाहन भागीदार आहे. ब्रँड्स आणि लीगमधील ही भागिदारी नाविन्य, कामगिरी आणि मर्यादा पार करण्याविषयीच्या समान ध्येयांतून करण्यात आली आहे.

शुभारंभाचा सीझन नवी दिल्लीतील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू मैदानात ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू होईल व त्यानंतर मुंबई, पुणे, अहमदाबादसारख्या प्रमुख शहरात त्याचे आयोजन केले जाईल. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ दरम्यान या शहरातील चाहत्यांना कौशल्य, धाडसी मॅन्युव्हर्स, वेगवान अक्शन यातून उदयास येत असलेले नव्या प्रकारचे सुपरक्रॉस रेसिंग अनुभवता येईल.

‘सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगने मोटरस्पोर्ट्स चाहत्यांची मने जिंकण्याचे, त्यातल्या थराराची अनुभूती चाहत्यांना देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,’ असे सुपरक्रॉस इंडिया प्रा. लि. चे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले. सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे (सीआयएसआरएल) लाँच भारतीय मोटरस्पोर्ट्स आणि वाहन उद्योगासाठी महत्त्वाची घटना आहे. तरुण रायडर्सना आपले कौशल्य दाखवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय रायडर्ससह आपल्या गुणवत्तेचा विकास करण्यासाठी तसेच प्रायोजक आणि उत्पादकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी व्यासपीठ पुरवण्याचे ध्येय लीगने ठेवले आहे. वाहन उत्पादकांनाही यात आपली अत्याधुनिक उत्पादने व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर करण्याची संधी मिळणार आहे. आयएसआरएल हे भारतात मोटरस्पोर्ट्सचा विकास करण्याच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. जागतिक स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे या क्षेत्राचा वाहन उद्योगावर चांगला परिणाम होईल.

यारप्रसंगी एफएमएससीआयचे अध्यक्ष अकबर इब्राहीम म्हणाले, ‘भारतात मोटरस्पोर्ट्स संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी एसएक्सआय टीमने हाती घेतलेल्या उपक्रमाने फेडरेशन भारावून गेली आहे. या उपक्रमामुळे भारतात जागतिक गुणवत्ता येण्यास मदत होईल, शिवाय तरुण गुणवत्तेला भारतात व्यासपीठ मिळेल. या उपक्रमामुळे या खेळात भारताला जागतिक नकाशावर स्थान मिळेल.’

अर्जुन कपूर म्हणाले, ‘लहानपणापासूनच मला सुपरक्रॉस रेसिंगमधला थरार आकर्षित करत आला आहे. आज या अद्भुत वातावरणात, गरजणाऱ्या इंजिन्सच्या सहवासात वावरताना मी भारावून गेलो आहे. सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये जगातील सर्वोत्तम रायडर्स एकमेकांना कडवी टक्कर देतील, शिवाय सुपरक्रॉसचा थरार व आनंद पुढच्या पिढ्यांना अनुभवता यावा म्हणून नवा मार्ग आखून देतील.’

सीएट लिमिटेडचे प्रमुख विपणन अधिकारी श्री. लक्ष्मीनारायणन बी म्हणाले, ‘सुपरक्रॉस रेसिंग लीगचे टायटल प्रायोजक    होताना आम्हाला अभिमान वाटत आहे. स्पर्धात्मक क्रीडा कार्यक्रमांचा थरार, त्यासाठी वाटणारी तळमळ यांना पाठिंबा देण्याची आमची जुनी परंपरा या निमित्ताने परत अधोरेखित झाली आहे. २०१४ पासून सीएट डर्ट बायकिंग क्षेत्रात कार्यरत असून २०२३ मध्ये कंपनी नवी ग्रिप एमएक्स रेंज सादर करणार आहे. सीएटचे आधुनिक आणि उच्च कामगिरी करणारे टायर्स सुपरक्रॉसच्या आव्हानात्मक प्रदेशासाठी अगदी योग्य आहेत. त्याची चांगली पकड रायडर्सना आवश्यक नियंत्रण मिळवून देते. टायटल प्रायोजक या नात्याने आम्ही सुपरक्रॉस रेसिंगचा थरार आणि उर्जा उंचावण्याचे ध्येय ठेवले आहे. एक दमदार सीझन अनुभवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या उर्जादायी खेळाचा भाग होऊन भारतातील त्याच्या विकासासाठी व लोकप्रियतेसाठी योगदान देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading