शार्दुल सुधाकरराव जाधवर विज्ञान शाखेच्या इयत्ता १२ वी चा निकाल १०० टक्के
साईराम वाक्चौरे, प्रांजली जाधव, श्रवण कुलकर्णी ८० टक्क्यांच्या पुढे ; संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचे अभिनंदन
पुणे : न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या शार्दुल सुधाकरराव जाधवर कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज च्या विज्ञान शाखेचा १२ वी निकाल १०० टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतील साईराम वाक्चौरे (८८.८३ टक्के), प्रांजली जाधव (८३.६७ टक्के), श्रवण कुलकर्णी (८३ टक्के) हे अव्वल आले आहेत. तर, ज्युनियर कॉलेजचा एकूण निकाल ९८.४१ टक्के लागला आहे.
जाधवर ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह सर्व प्राचार्य, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
शार्दुल सुधाकरराव जाधवर कॉमर्स अँड सायनस ज्युनियर कॉलेजच्या वाणिज्य शाखेत श्रेयांश शितोळे याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर, जाधवर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यू. कॉलेजमधील विज्ञान शाखेत अमेय गोंगणे ( ९१.१७ टक्के) आणि वाणिज्य शाखेत लक्ष्मी सिरवी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
संस्थेच्या पॅराडाईज जू. कॉलेजमधील विज्ञान शाखेमधून समिक्षा सोलंके (८३.१७ टक्के) , वाणिज्य शाखेत प्रिती चित्ते (७९.१७ टक्के) आणि कला शाखेत ज्ञानेश्वर पवार (८०.३३ टक्के) याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. मुलांसोबतच मुलींनी देखील परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळविले असून संस्थेतर्फे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे.