fbpx

जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थी १२ वी च्या परीक्षेत यशस्वी

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमधील इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. योजनेंतर्गत बी.एम.सी.सी.महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकणा-या सोहम इजंतकर हा ८८.६७ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे.

जय गणेश पालकत्व योजनेतील ३ विद्यार्थ्यांनी ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. वाणिज्य शाखेत ८, विज्ञान शाखेत ६, कला शाखेत १ आणि व्होकेशनलमध्ये १ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

बी.एम.सी.सी. वाणिज्य शाखेत शिकण-या सामली राठोड हिला ७९ टक्के, आबासाहेब गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकणा-या प्रेरणा गव्हाणे हिला ७२.३३ टक्के गुण मिळाले आहेत. तर, हुजूरपागा वाणिज्य शाखेतील शिवानी शिर्के हिला ७२ टक्के गुण मिळाले आहेत. याशिवाय लक्ष लोखंडे, श्री धरमकारे, वेंदात वाडेकर, संध्या नंदगुरे, रोहिणी रेणूके, श्रावणी साळुंके, वैष्णवी लामतुरे, साक्षी कोंढाळकर, निखील कांबळे, पूजा घोटकुले यांना ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

सोहम इजंतकर हा माणिकबाग येथे रहात असून इयत्ता ३ री पासून पालकत्व योजनेत आहे. ट्रस्टच्या योजनेमुळे मला खूप मदत झाली असून पुढे सीए होण्याचे माझे स्वप्न असल्याचे सोहम इजंतकर याने सांगितले. तर, सामली राठोड ची आई घरकाम करुन संसाराचा गाडा सांभाळत आहे. अरण्येश्वर परिसरात राहणा-या सामली ला देखील सीए करायचे असल्याची इच्छा तिने व्यक्त केली. या दोघांच्या पुढील शिक्षणाकरिता ट्रस्टने मदतीचा हात दिला आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, सन २०१० पासून विद्यार्थी पालकत्व योजना ट्रस्टच्या वतीने सुरु आहे. इयत्ता १० वी आणि १२ वी हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असतात. त्यामुळे याकाळात त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहून योग्य दिशा दाखविणे आणि मार्गदर्शन व मदत करणे आवश्यक असते. यादृष्टीने जय गणेश ज्ञानवर्धन अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता कार्य सुरु आहे. इयत्ता १२ वी मध्ये उत्तम यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे विश्वस्तांनी अभिनंदन केले असून यापुढेही विद्यार्थ्यांना मदत देण्यास ट्रस्ट तत्पर असेल, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: