fbpx

Maharashtra Board HSC Result 2023 : राज्याचा निकाल 91. 25 टक्के; मुंबईतील निकालाची टक्केवारी सर्वात कमी   

तर मुंबई विभागाचा निकाल हा सर्वात कमी म्हणजे 88.13 टक्के इतका लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी या परीक्षेत बाजी मारली आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा यंदा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. यापरीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून जवळपास 14 लाख 28 हजार 94 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील  14 लाख 16 हजार विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले. त्यातील 12 लाख 92 हजार विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तब्बल 152 विषयांसाठी सहा भाषांमध्ये 12 वीची परीक्षा घेण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विभागवार निकालाची टक्केवारी खालीलप्रमाणे –
पुणे: 93.34 टक्के
नागपूर: 90.35 टक्के
औरंगाबाद: 91.85 टक्के
मुबई: 88.13 टक्के
कोल्हापूर: 93.28 टक्के
अमरावती: 92.75 टक्के
नाशिक: 91.66 टक्के
लातूर: 90.37 टक्के
कोकण: 96.01 टक्के

Leave a Reply

%d bloggers like this: