Maharashtra Board HSC Result 2023 : आज दुपारी 2 वाजता जाहीर होणार निकाल; असा पहा निकाल
पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा (Maharashtra Board HSC)च्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. राज्याचा एकूण निकाल हा 91.25 टक्के इतका लागला असल्याचे शिक्षण मंडळाच्यावतीने आज जाहीर करण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी दोन नंतर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पहता येणार आहे. तसेच निकालाची अधिकृत प्रत लवकरच महाविद्यालयांमधून देण्यात येईल.
या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल ?
ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी –
mahresult.nic.in जावून HSC result 2023 या लिंकवर क्लिक करा
|
तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाका
|
निकालाची PDF प्रिंटआऊट काढा किंवा save करा
SMS द्वारेही पाहता येणार निकाल –
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.