fbpx

पुण्यातील कुमठेकर रोड आता करणार आधुनिकतेचा स्वीकार –  सिग्मा वन बिझबे ची सुरुवात

पुणे, रिअल इस्टेट, लिजिंग, बांधकाम, कॉन्ट्रॅक्टिंग आणि संबंधित कार्यांत अग्रेसर असलेल्या बहुआयामी आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सिग्मा वन युनिव्हर्सल कडून आज आपला महत्त्वपूर्ण व्यावसायिक प्रकल्पसिग्मा वन बिझबे सुरु करत असल्याची घोषणा केली. हा आयकॉनिक मास्टरपीस पुण्यातील कुमठेकर रोडवर अगदी मोक्याच्या ठिकाणी असल्याने शहराचा व्यावसायिक चेहेरामोहरा  बदलणार आहे. सिग्मा वन बिझबे ही एक आठ माजली इमारत असून यामध्ये  कार्यक्षमता, सुंदरता आणि सुविधांच्या समावेश करण्यात आला आहे. अगदी बारकाईने केलेल्या डिझाईनमध्ये ग्लास फॅसेर्ट्स आहेत जे सुंदरता वाढवण्या बरोबरच  पुण्यामधील रिटेल आणि इतर व्यवसायांसाठी आवश्यक दृश्यमानतासुद्धा देते.

जागतिक स्तरावरील पुण्यातील आघाडीच्या खाजगी रिअल इस्टेट सेवा प्रदाता संस्थे कडून केलेल्या आणि सिग्मा वन युनिव्हर्सल ने केलेल्या  संशोधनानुसार, ७.३ दशलक्ष लोकसंख्या असलेले पुणे हे, महाराष्ट्रातील भरभराटीला येत असलेले, भारतातले सातवे सर्वांत मोठे महानगर आहे. जगण्यातील सहजता आणि अजोड जीवनशैली देणारे हे शहर असून १२९.२६ एवढा जगण्याची गुणवत्ता दर्शवणारा निर्देशांक (लाईफ इंडेक्स) असल्याने पुण्यातील वातावरण हे नागरिक आणि व्यवसाय दोन्हीसाठी अनुकूल आहे. एकूण ८.१ दशलक्ष रिटेल स्पेस असल्याने आणि फक्त ६.६०% रिकामी जागा असल्याने अशा जागांसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, परिणामी पुणे एक सक्षम असे रिटेल क्षेत्र बनले आहे. प्रत्येक वर्षी अशी कमी होत जाणारी रिटेल क्षेत्रातील व्हेकन्सी यामुळे सततची मागणी वाढत आहे आणि या क्षेत्रातील वाढीची शक्यता यावर हे संशोधन प्रकाश टाकते. ऐतिहासिक महत्व असलेला पेठांचा भाग फक्त पुण्यातल्याच नाही तर आसपास असलेल्या अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि लोणावळासारख्या शहरातील ग्राहकांनासुद्धा आकर्षित करतो.

शहरातील अन्य भागातील गुंतवणूकीपेक्षा गुंतवणूकदारांना शहरी भागातील भाड्याचे उत्पन्न हे ६.८ टक्क्यांपर्यंत मिळत असल्याने पुणे हे गुंतवणूकीच्या बाबतीत खूपच आकर्षक ठिकाण बनले आहे.

एकदम महत्त्वपूर्ण ठिकाणी असलेल्या सिग्मा वन बिझबेमुळे रिटेलर्स, उद्योजक आणि पुण्यात आपली उपस्थिती दाखवण्यासाठी उत्सुक असलेले उपक्रम या सर्वांना चांगला फायदा मिळतो. हे ठिकाण सोयीस्कर प्रवेश आणि लोकांचे मोठ्या प्रमाणावर येणे जाणे याची खात्री देते त्यामुळे व्यवसायांच्या विकासासाठी ही आदर्श जागा ठरू शकते.

या सुरुवातीची घोषणा करतांना, सिग्मा वन युनिव्हर्सलचे व्यवस्थापकीय संचालक, कपिल गांधी म्हणाले, “सिग्मा वन हे पुण्याच्या सर्वांत जुन्या आणि वर्दळीचे शॉपिंग डेस्टिनेशन असल्यामुळे याची घोषणा करतांना आंम्हाला आनंद होत आहे. आमच्या असं लक्षात आलं आहे की  महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक या भागात खरेदीचा आनंद घेण्यासाठी येतात. इथे जागा घेण्यापूर्वी आम्ही एक सखोल असा संशोधनात्मक अभ्यास केला होता ज्यातून आम्हाला या भगातील  क्षेत्राचे महत्त्व समजायला मदत झाली. परंपरागत दृष्ट्या कुमठेकर रोड आणि लक्ष्मी रोड हे दोन्ही रस्ते १ किमी लांबीचे आहेत आणि या परिसरात ५०० हून अधिक छोटी मार्केट्स आहेत.  कपड्यांचे विविध ब्रॅन्ड्स या गजबजलेल्या भागात असून कपड्यांच्या बाजारपेठेचा यामध्ये ७५ टक्के हिस्सा आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे त्यानंतर दागिन्यांचे विविध ब्रॅन्ड्स याच भागात आहेत व बाजारपेठेचा १५ टक्के हिस्सा येथे आहे.  म्हणूनच या भागात मोठी संधी आहे कारण या भागात सर्वाधिक काळात अंदाजे १ लाख ८० हजार लोक रोज भेट देत असतात. शहर आणि पेठांचा भाग यांच्यासाठी सर्वोत्तम देण्याची दृष्टी ठेऊन आम्ही या ठिकाणामार्फत अपेक्षांच्या पलीकडे देण्यासाठी कटिबद्ध आहोत. सिग्मा वन बिझबेद्वारे खरेदीदारांच्या वेगवेगळ्या गरजा ओळखून आम्ही त्यांना आनंददायी आणि कायापालट करणारा अनुभव देणार आहोत.”

सिग्मा वन युनिव्हर्सलचे आर्किटेक्चरल संचालक आणि संकल्प डिझायनर्सचे संस्थापक शीतेश अग्रवाल म्हणाले, “आमच्याकडील प्रतिभावान आर्किटेक्ट्स आणि डिझायनर्स यांनी अशी रचना केली आहे की फक्त डोळेच खिळून राहणार नाहीत तर एकंदर कार्यक्षमता देखील  वाढलेली दिसून येईल. ही अत्याधुनिक रचना म्हणजे नावीन्यपूर्णता आणि प्रगतीचे प्रतीक आहे. रचनेमधील प्रत्येक गोष्ट, अगदी विचारपूर्वक ठरवलेले खिडक्यांचे स्थान ते आतील जागेचे योग्य लेआऊट, आपला अनुभव परिपूर्ण करेल. सिग्मा वन बिझबे हा आयकॉनिक मास्टरपीस फक्त आपल्या आजूबाजूच्या ठिकाणांचे लँडस्केप उंचावत नाही तर डिझाईन आणि कार्यक्षमता यांवरील आमच्या निष्ठेवर शिक्कामोर्तब करतो.”

सिग्मा वन बिझबेमध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधा आहेत ज्यामध्ये आधुनिक रिटेल जागा, ऑफिससाठी लवचिक अशा  जागा आणि व्यावसायिक गरजांनुसार रचना करता येण्यासारख्या जागा देण्यात आल्या आहेत.  उत्साहवर्धक आणि अनुकूल वातावरण निर्मिती करताना, आम्ही या प्रकल्पातील सहकार्य, कार्यक्षमता आणि विकास याकडे विशेष लक्ष देण्याचे ध्येय ठेवतो. तसेच मल्टी ब्रॅण्ड्स रिटेल आउटलेटसाठी सर्व पातळ्यांमधून एकच मोठे युनिट तयार करण्याची लवचिकतासुद्धा देतो.

सिग्मा वन यांनी आजवर नवीन डेव्हलोपमेंट ईविएम कॉन्ट्रॅटिंग मिळून असे १५ प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर, या संस्थेचे तीन प्रकल्प सुरु आहेत ज्यामुळे त्यांची विकासाची दृष्टी समजून येते. त्यांनी सर्व मिळून १५ लाख चौरस फूट जागा याआधीच विकसित केली आहे त्यामुळे सिग्मा वनची दर्जा आणि उत्कृष्टतेवरील निष्ठा दिसून येते. सिग्मा वनच्या यशाचे एक रहस्य म्हणजे ग्राहकांच्या समाधानाला महत्व देणे. वर्षानुवर्षे ग्राहकांना आनंदित ठेवल्यामुळे त्यांनी त्यांची निष्ठा आणि  विश्वास प्राप्त  केला आहे. सिग्मा वन हे ‘अ ला कार्ट’ प्रकारच्या घरांचे आणि घरासारख्या कस्टमायझेशनचे प्रवर्तक आहेत ज्यामध्ये रिअल इस्टेटमधील व्हेईकल फ्री झोन , बहुस्तरीय पार्किंग, हिडन पार्किंग, भेगाविरहित पेंट  अशा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: