महाविकास आघाडीची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न
पुणे : आज काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, व शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे व संजय मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत पुणे महानगरपालिकेमधील भाजपाचा भ्रष्टाचार व शिंदे – फडणवीस राज्यात बसून पुणे महानगरपालिकेतील टेंडर राज व विशिष्ट ठेकेदार चालवित असलेली पुणे महानगरपालिका व प्रशासन या विरूध्द दि. १६ जून २०२३ रोजी पुणे महानगरपालिकेवर मोर्चाचे आयोजन करण्याचे ठरले.
लाल महाल येथे सुरू होणारा मोर्चा पुणे महानगरपालिका भवनवर काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचा हा मोर्चा पुणे महानगरपालिकेतील ठेकेदार व प्रशासन यांच्या भ्रष्टाचाराविरूध्द काढण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सर्व आजी माजी आमदार, आजी माजी नगरसेवक, प्रदेश प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
