टीव्ही कलाकारांच्या समर स्किनकेअर सिक्रेट्सचा उलगडा!
उन्हाळा ऋतू आला आहे आणि सोबत समुद्रकिनारी वाळूमध्ये सूर्यप्रकाशात धमाल करण्याची संधी देखील आली आहे. पण, आपली त्वचा तेलकट, निस्तेज किंवा काळी पडण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण उन्हाळा आपली त्वचा आरोग्यदायी, चमकदार व हायड्रेटेड राहण्याची खात्री घेण्यासाठी एण्ड टीव्ही कलाकार त्यांच्या सिक्रेट स्किनकेअर रूटिन्सबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत नेहा जोशी (यशोदा, ‘दूसरी माँ’), कामना पाठक (राजेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाभी, ‘भाबीजी घर पर है’). एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी माँ’मध्ये यशोदाची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्हणाल्या, ‘‘हायड्रेट टू रेडिएट! हा स्किनकेअरचा गोल्डन रूल आहे, ज्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मी सध्या जयपूर शहरातील उष्ण वातावरणात माझ्या मालिकेसाठी शूटिंग करत आहे, जेथे सूर्य प्रखरतेने तळपत आहे. कलाकार म्हणून त्वचा आरोग्यदायी राखणे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि मला त्यासाठी दररोज किमान तीन लीटर पाणी पिणे आवश्यक असल्याचे समजले आहे. सेटवर असो किंवा व्यायाम करत असो मी माझ्यासोबत नेहमी पाण्याची बॉटल ठेवते. मी नैसर्गिक व ऑर्गनिक स्किनकेअर उत्पादनांचा वापर करते, जसे फेस ऑईल्स व अॅलो जेल, जे माझी त्वचा मॉइश्चराइझ राहण्यास मदत करतात. तसेच मी उन्हाळ्यादरम्यान माझ्या त्वचेला पोषण देण्यासाठी दूध, हळद, मध, बेसन व स्क्रब्सपासून बनवलेल्या घरगुती फेस पॅक्सचा वापर करते. आणि दही माझे उन्हाळ्यातील तारणहार आहे. हे नैसर्गिक डी-टॅनर आहे, जे माझ्या त्वचेला ताजेतवाने व आरोग्यदायी राहण्यास मदत करते. मी आठवड्यातून दोनदा माझ्या चेहऱ्यावर फेस पॅकचा वापर करते. ते हायड्रेटिंग एक्स्फोलिएटर आहे, जे मृत त्वचा पेशींना दूर करते, डाग कमी करते आणि स्पॉट क्लीन्सर म्हणून काम करते. अनेक फायद्यांसह दही माझ्या त्वचेला उत्साही व चमकदार बनवते. म्हणून तुम्ही तुमची त्वचा उन्हाळ्यादरम्यान हायड्रेटेड व पोषणयुक्त ठेवण्यासाठी सोप्या, पण गुणकारी पद्धतीचा शोध घेत असाल तर दहीचा वापर करण्यास विसरू नका.’’
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील कामना पाठक ऊर्फ राजेश सिंग म्हणाले, ‘‘उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची अधिक काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी हायड्रेशन महत्त्वाचे आहे. वातावरण अधिक तप्त होण्यासह शरीरामधून घामाच्या धारा वाहत असताना आपला चेहरा तेलकट व निस्तेज दिसून शकतो. पण काळजी करू नका. माझ्याकडे सिक्रेट समर हर्ब उपाय आहे, जो तुम्हाला यामधून आराम देऊ शकतो, ते म्हणजे गुलाबपाणी! गुलाबपाणी हे शक्तिशाली स्किन टॉनिक आहे, जे त्वचेच्या पृष्ठभागावरील रक्ताभिसरण वाढवते. ज्यामुळे हे माझे आवडते समर स्किनकेअर हॅक आहे. यामध्ये कॅल्शियम व पोटॅशियम सारखे व्हिटॅमिन्स व मिनरल्स असतात, जे आपल्या त्वचेमधील पेशींच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. आणि सर्वोत्तम बाब म्हणजे ते सर्व प्रकारच्या त्वचेसाठी, अगदी संवेदनशील त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. मी १०० मिली गुलाबपाण्यामध्ये एक चमचा शुद्ध ग्लिसरिन मिक्स करते, ते मिश्रण हवाबंद बॉटलमध्ये ठेवते. ज्यामधून मला हायड्रेटिंग मिश्रण मिळते, जे माझ्या त्वचेला तेलकट न करता पोषण देते. मी माझ्या चेहऱ्यावरील व हातांवरील निस्तेजपणा दूर करण्यासाठी या मिश्रणाचा वापर करते आणि प्रत्येकवेळी ते माझ्यासाठी चांगली कामगिरी करते. मी शूटिंग करताना किंवा घराबाहेर जाताना सर्वत्र हे मिश्रण माझ्यासोबत ठेवते, कारण समर स्किनकेअरबाबत तडजोड करता कामा नये. उन्हाळा सुरू झाला आहे आणि आपल्या त्वचेची अधिक काळजी घेण्याची वेळ आली आहे. या गुलाबपाणी उपायाचा अवलंब करा आणि तुमच्या त्वचेला चमकदार बनवा!’’ मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाभी म्हणाल्या, ‘‘उन्हाळा आपल्या त्वचेसाठी अवघड काळ ठरू शकतो आणि उष्ण तापमान व घामामुळे त्वचा स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. याच कारणामुळे मला माझ्या प्रकारच्या स्किनकेअर रूटिनचा वापर करायला आवडते. शुद्ध व स्वच्छ कॉम्प्लेक्शनसाठी माझा आवडता उपाय म्हणजे दोन चमचे मीठ, एक चमचा लिंबाचा रस आणि काही थेंब ऑलिव्ह ऑईलपासून बनवलेले साधा, पण गुणकारी फेस स्क्रब. मी चेहऱ्यावरील अतिरिक्त धूळ व तेलकटपणा दूर करण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा या स्क्रबचा वापर करते, ज्यामुळे माझी त्वचा ताजेतावने व टवटवीत दिसते. पण, फक्त एवढेच नाही! अधिक प्रमाणात सूर्यप्रकाशात राहिल्यास मी दुसऱ्या विश्वसनीय उपायाचा देखील अवलंब करते, ते म्हणजे ताकासह माझा चेहरा स्वच्छ धुते. यामुळे त्वचेच्या होणाऱ्या जळजळीपासून आराम मिळण्यासोबत त्वचेला कोमलता मिळते, दह्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुण आहेत. परिपूर्ण समर स्किनकेअर रूटिनसाठी तुमचे ओठ आणि मान एक्सफोलिएट करायला विसरू नका! तर मग, तुम्हाला उष्ण उन्हाळ्यादरम्यान स्वच्छ व आरोग्यदायी त्वचेबाबत माझा सिक्रेट मंत्र समजला असेल. या मंत्राचा अवलंब करा आणि उत्साही, चमकदार उन्हाळ्याचा आनंद घ्या!’’