Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एकनाथ शिंदे स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत – अजित पवार

मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि सध्याच्या लोकांमध्ये खूप फरक आहे, त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राजीनामा देण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. ते स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत, असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.   

शुक्रवारी शिवसेना (ठाकरे गट) नेते उद्धव ठाकरे यांनी नैतिक आधारावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केल्यानंतर शुक्रवारी भाष्य केले.

राज्यातील 2022 च्या राजकीय संकटावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निकालानंतर ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे उप देवेंद्र फडणवीस यांचा नैतिक कारणास्तव राजीनामा मागितला होता. ही मागणी सत्ताधारी  नेत्यांनी त्वरीत फेटाळली.

यावर अजित पवार म्हणाले, ठाकरे यांनी राजीनामा दिला तेव्हाच हे प्रकरण संपल होत. त्या काळी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता किंवा महाविकास आघाडीकडून हे पद वेळेत भरले गेले असते तर ही वेळ आली नसती. तात्कालिन परिस्थिती उद्भवली यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच नेते जबाबदार आहेत. यासाठी कोण्या एकाला जबाबदार धरता येणार नाही.   तसेच सर्वोच्च न्यायालयाने सत्तांतराचा सर्व घटनाक्रम बेकायदा असल्याचे मान्य केले असले तरी शिंदे – फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याच्या समीक्षेची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading