Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नॉट रिचेबल झालेले नरहरी झिरवाळ आले मीडियासमोर

नाशिक : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता.  आज राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे.  या निकालाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे नॉट रिचेबल झाले होते. त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. मात्र त्यानंतर ते नाशिकमध्ये आले आहेत. एवढचं नव्हे तर त्यांनी 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात मोठ भाष्य देखील केले आहे. 

आज सत्तासंघर्षाचा निकाल आहे. आजचा निकाल हा त्या 16 आमदारांना अपात्र ठरवणारा असेल. 16 आमदार अपात्र होतील. एकनाथ शिंदेंचाही अपात्र आमदारांमध्ये समावेश आहे. त्यामुळे सरकार कोसळेल असं झिरवाळ यांनी म्हटलं आहे. त्यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. न्यायालयाने अपात्रतेचा निर्णय घेण्यास विधिमंडलास सांगितले तर तो माझ्याकडे येईल कारण त्यावेळी मिठसण अधिकारी होते असे त्यांनी नमूद केले. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading