Sunday, October 18, 2026
BusinessLatest News

आर आर काबलतर्फे आयपीओ साठी डीआरएचपी सादर

भारतातील पाचव्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या ब्रँडेड वायर्स आणि केबल्स उत्पादक आर आर काबल कंपनीने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे इक्विटी शेअर्सच्या आगामी प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) साठी दाखल केला आहे.

कंपनीने २२५ कोटी रुपयांपर्यंत फ्रेश इश्यूद्वारे आणि प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्याचे १७,२३६,८०८ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल मधून निधी उभारण्याची योजना आखली आहे. आर आर काबल कंपनीने बँका आणि वित्तीय संस्थांकडून अंदाजे १७० कोटी रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जाची संपूर्ण किंवा अंशत: परतफेड किंवा पूर्वफेड यातून करण्यात येणार आहे.

यूएस स्थित प्रायव्हेट इक्विटी फर्म टीपीजी एशिया VII एसएफ पीटीई लिमिटेडची आर आर काबल मध्ये २०.९९% हिस्सेदारी असून आयपीओच्या माध्यमातून ते कंपनीतील काही भागभांडवल विकणार आहे.

आर आर काबल हा आर आर ग्लोबल ग्रुपचा एक भाग असून आर्थिक वर्ष २२ मध्ये त्यांचा महसूल ४,३८६ कोटी रुपये आहे. डिसेंबर २०२२ मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांसाठी कंपनीचा महसूल ४,०८३ कोटी  रु. होता. निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२२ साठी २१४ कोटी रुपयांवर आणि डिसेंबर २०२२ मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांसाठी १२५ कोटी रुपयांवर आला.

ही फर्म भारतीय ग्राहक विद्युत उद्योगातील एक अग्रगण्य कंपनी आहे ज्यामध्ये वायर्स आणि केबल्स आणि फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स (FMEG) यांचा समावेश आहे. भारतात २० हून अधिक वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी कामकाज केले आहे. आर आर काबल ही भारतातील आमच्या सहकाऱ्यांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी ग्राहक इलेक्ट्रिकल कंपनी असून आर्थिक वर्ष २० आणि आर्थिक वर्ष २२ दरम्यान ३३% च्या CAGR ने वाढणारी आहे. (स्रोत: टेक्नोपाक रिपोर्ट)

आर्थिक वर्ष २२ मधील बाजार मूल्यात या फर्मचा बाजारपेठीय हिस्सा सुमारे ८% आहे. हेच प्रमाण आर्थिक वर्ष १५ मध्ये ५% होते. आर आर काबल ने आर्थिक वर्ष २२ मध्ये बीटूसी विक्री चॅनलमधून सुमारे ७५% महसुलासह वायर्स आणि केबल्समधील व्यवसाय-ते-ग्राहक विक्री चॅनेलमधून सर्वाधिक महसूल योगदान प्राप्त केले आहे.

आर आर काबल हा मूल्याच्या बाबतीत भारतातील वायर्स आणि केबल्सचा सर्वात मोठा निर्यातदार देखील असून त्यांचा निर्यातीतील बाजारपेठीय हिस्सा सुमारे ११% आहे. कंपनीकडे इलेक्ट्रिशियनचे सर्वात मोठे नेटवर्क देखील आहे. त्यामध्ये आर्थिक वर्ष २२ पर्यंत भारतभरात १४७,८१० इलेक्ट्रिशियन समाविष्ट आहेत.

३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी एफएमईजी विभागातील आर आर काबल चे महसूल योगदान सर्वाधिक म्हणजे १०.९२% आहे.

अॅक्सीस कॅपिटल लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading