यंदा मातृदिनाला एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी माँ’सह ‘मातृत्वा’ला साजरे करा!
आई-मुलाचे नाते चिरंतन, नि:स्वार्थ, प्रबळ आणि बिनशर्त प्रेमावर आधारित असल्याचे मानले जाते. मातृत्व प्रेम व आपुलकीला कोणतीही बंधने नसली तरी ते जटिल असू शकते, विशेषत: तो मुलगा तुमच्या पतीचा अवैध मुलगा असतो तेव्हा अनेक प्रश्ने निर्माण होतात. एण्ड टीव्हीवरील कौटुंबिक मालिका ‘दूसरी माँ’ मातृत्वाच्या या नात्याला सुरेखरित्या सादर करते. मालिका एक आई यशोदाच्या (नेहा जोशी) जीवनप्रवासाला दाखवते, जी उत्तरप्रदेशमध्ये तिचा पती अशोक (मोहित डागा), तिच्या दोन मुली आणि तिच्या सासरच्या माणसांसोबत आनंदाने राहत असते. पण ती नकळतपणे तिच्या पतीचा अवैध मुलगा कृष्णाला (आयुध भानुशाली) दत्तक घेते आणि तिचे आनंदी, शांतमय कौटुंबिक जीवन अस्ताव्यस्त होऊन जाते. टेलिव्हिजन व चित्रपटांमध्ये प्रबळ मातांच्या अनेक भूमिका साकारल्या गेल्या असताना देखील मालिका ‘दूसरी माँ’मधील यशोदाच्या भूमिकेला वरचढ ठरवणारी बाब म्हणजे मी तिचे मातृत्व कर्तव्य आणि फसवणूक केल्याच्या वेदनेमध्ये संतुलन ठेवू शकते. ज्यामुळे मातृत्वासंदर्भात तिची भूमिका अद्वितीय आहे. आपल्या पतीच्या गतकाळाबाबत समजण्याच्या आणि कृष्णासाठी स्वत:चे कुटुंब व समाजाविरोधात उभे राहण्याच्या तिच्या प्रवासाने या मालिकेला भारतीय टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कौटुंबिक मालिका बनवले आहे.
यंदा मातृदिनानिमित्त जयपूरमध्ये प्रमुख कलाकार – यशोदा (नेहा जोशी) व कृष्णा (आयुध भानुशाली) त्यांच्या भूमिका आणि पडद्यावरील व पडद्यामागील नात्याबाबत सांगत आहेत. मालिका ‘दूसरी माँ’मधील नेहा जोशी ऊर्फ यशोदा म्हणाल्या, ‘‘मालिका ‘दूसरी माँ’ मातृत्वाच्या अतूट भावनेला साजरे करते. मालिकेमधील प्रमुख पात्र यशोदा जीवनातील आव्हानांना झुगारून आपल्या मुलांना अविरत पाठिंबा देते. मुलांवरील तिचे प्रेम रक्ताच्या नात्याच्या पलीकडील आहे आणि ती तिचा मुलगा कृष्णाच्या संरक्षणासाठी सर्व विषम स्थितींविरूद्ध लढते. यशोदा नीडर, पालनपोषण करणाऱ्या मातृत्वाचे प्रतीक आहे आणि तिची तीन मुले: कृष्णा (आयुध भानुशाली), आस्था (अद्विका शर्मा) व नूपुर (आन्या गोलवान) यांची सुरक्षितता व स्वास्थ्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते. यशोदा तिच्या तिन्ही मुलांना समान वागणूक देते आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना चांगले संस्कार देते व कुटुंबाला एकत्र राखण्याचा प्रयत्न करते. ती स्वावलंबी, प्रबळ इच्छाशक्ती असलेली महिला आहे, जिच्यासाठी तिची मुले विश्व आहे, ज्यामुळे ती आदर्श आई आहे.’’ त्या पुढे म्हणाल्या, ‘‘माझ्या मते ही वास्तविक जीवनात व मालिकेमध्ये साकारू शकेन अशी सर्वात प्रबळ भूमिका आहे. या तीन प्रेमळ मुलांच्या आईची भूमिका साकारताना मला मातृत्वाची जाणीव होते. आम्ही जयपूरमध्ये आमच्या मालिकेसाठी शूटिंग करत आहोत आणि ही मुले आसपास असल्याने घरी असल्यासारखे वाटते. आम्ही एकत्र खूप वेळ धमाल करतो, गप्पागोष्टी करतो आणि सेटवर तालीम देखील करतो. आम्हाला शूटिंगमधून ब्रेक मिळाला की गुलाबी शहरामध्ये फेरफटका मारायला जातो आणि येथील स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतो. आमच्यामधील नाते अत्यंत खास आहे. वास्तविक जीवनात देखील मी त्यांना माझ्या मुलांसारखीच वागणूक देते.’’
मालिका ‘दूसरी माँ’मधील आयुध भानुशाली ऊर्फ कृष्णा म्हणाला, ‘‘कृष्णा व यशोदा यांच्यामधील नाते अविश्वसनीय आहे. ती कृष्णाप्रती दाखवणारे प्रेम, काळजी व पाठिंबा मातृत्वाचे खरे प्रतीक आहेत. कुटुंब कृष्णाला त्यांचा वारस म्हणून स्वीकारण्यास तयार नाही, तसेच त्याला त्यांच्या जीवनामधून बाहेर काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. असे असताना यशोदा त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याला समान अस्तित्व देण्यासाठी सर्व विषम स्थितींविरूद्ध लढत आहे.’’ तो पुढे म्हणाला, ‘‘मी नेहा जोशी यांना पडद्यामागे देखील प्रेमाने आई म्हणून हाक मारतो, ज्यामुळे आमच्यामधील नाते दृढ झाले आहे. त्या माझे संरक्षण करण्यासोबत माझी उत्तम काळजी देखील घेतात. आम्ही येथे जयपूरमध्ये एकत्र बराच वेळ व्यतित करतो. त्या आसपास असल्या की मला खूप आनंद होतो आणि कम्फर्टेबल देखील वाटते. त्यांच्यासोबत कधीच कंटाळवाणे वाटत नाही आणि आम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतो.’’
