fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ED ची नोटीस

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात निकाल आहे. त्यातच गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडी चर्चेत राहिल्या आहेत.  यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आलीय. सोमवारी जयंत पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएस या कंपनीतील व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता.

याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading