BIG NEWS : शरद पवारांची अनपेक्षित घोषणा अन् कार्यकर्त्यांचा विरोध; घोषणांनी दणाणले सभागृह
मुंबई : पुढील काळात आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरूनही निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. तसेच जनतेचा विश्वास आणि प्रेम हाच माझा श्वास आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी पवार यांनी मोठी घोषणा केली.

पवार पुढे म्हणाले, मला सामाजिक क्षेत्रात अजून काम करायचे आहेत. त्यामुळे अधिक काळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदावर मी राहणार नाही. मी निवृत्त होणार आहे. पुढील काळात राष्ट्रवादी पक्षातील वारिष्ट नेत्यांची एक समिती नेमली जाईल. अन् पुढील काळात ही समिती पक्षाचे काम पाहील.

दरम्यान, शरद पवार यांच्या या अनपेक्षित निवृत्तीच्या घोषणेमुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. व आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली आहे.
