Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

एअर इंडियाच्या विहान.एआय या परिवर्तन कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सांगता

नवी दिल्ली: भारतातील आघाडीची एअरलाईन आणि स्टार अलायन्समधील एक सदस्य एअर इंडियाने ५ वर्षांची सर्वसमावेशक परिवर्तन योजना विहान.एआयच्या पहिल्या टप्प्याची सांगता केली आहे. टॅक्सी असे संबोधण्यात आलेल्या या पहिल्या टप्प्यामध्ये एअरलाईनच्या लीगेसी संबंधित समस्यांचे निवारण करण्यावर आणि भविष्यातील वाढीचा पाया रचण्यावर भर देण्यात आला. आता टेक ऑफ या परिवर्तनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहेज्यामध्ये उत्कृष्टता निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले प्लॅटफॉर्म्सप्रक्रिया आणि यंत्रणा विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

टॅक्सी टप्पा समाप्त होत असल्याबद्दल एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले, “आमच्या परिवर्तन प्रवासाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये एअर इंडियन्स एका समान उद्दिष्टासाठी एकजुटीने काम करत होते, गेल्या अनेक वर्षात निर्माण झालेल्या अनेक समस्या दूर करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. टॅक्सी फेजमध्ये आम्ही प्रगतीचा पाया देखील रचला. आमची विक्रमी एअरक्राफ्ट ऑर्डर, सध्याच्या एअरक्राफ्ट्सचा संपूर्ण कायापालट घडवून आणण्यासाठी ४०० मिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची वचनबद्धता, नवीन आयटीमध्ये २०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक आणि अक्षरशः हजारो कर्मचाऱ्यांची भरती ही सर्व गुंतवणूक हा जागतिक विमान वाहतूक उद्योगक्षेत्रात एअर इंडिया आघाडीवर असावे यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचा केवळ एक भाग आहे. टेक ऑफ फेजमध्ये प्रवेश करत असताना या गुंतवणुकींची फळे मिळत असलेली दिसून येणार आहेत. सहयोगी व समर्थकांप्रती कृतज्ञतेची भावना मनात ठेवून सर्व एअर इंडियन्स ही वाटचाल पुढे सुरु ठेवत आहेत.”

 

टॅक्सी टप्प्यामध्ये मिळवलेले लक्षणीय यश:

ग्राहक:

  • एअरक्राफ्ट्सचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी तब्बल ४०० मिलियन यूएस डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची वचनबद्धता
  • आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत मार्गांवर मेन्यूमध्ये आमूलाग्र बदल
  • निवडक लांब पल्ल्याच्या फ्लाईट्समध्ये पहिल्यांदा सुरु केल्या प्रीमियम इकॉनॉमी सीट्स
  • काही महत्त्वाची ग्राहक सेवा फंक्शन्स सुरु करण्यात आली असून सर्व टचपॉइंट्ससाठी कस्टमर नोटिफिकेशन सिस्टिममध्ये सुधारणांना प्रारंभ
  • फेब्रुवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत १ मिलियनपेक्षा जास्त लीगेसी रिफंड केसेस सोडवण्यात आल्या.
  • सेवा पूर्ववत व्हाव्यात यासाठी अनेक वेगवेगळ्या कस्टमर कॉम्पेन्सेशन पॉलिसीजची अंमलबजावणी
  • नवीन कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटरसाठी आरएफपीची सुरुवात
  • ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी एआयएसएटीएससोबत हजारो अतिरिक्त एअरपोर्ट कर्मचाऱ्यांची नियुक्ती.

 

लोक:

  • संघटनेची नवी संरचना सर्वत्र सुरु करण्यात आली. कायमस्वरूपी आणि फुल-टर्म कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी यांच्यामधील असमानता दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांसह सर्व स्तरांवर भूमिकांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले.
  • कर्मचारी कल्याण अधिक चांगले व्हावे यासाठी सर्व कर्मचाऱ्यांसाठी २९ पेक्षा जास्त नवीन धोरणे सुरु करण्यात आली.
  • लीगसी कर्मचाऱ्यांसाठी नवीन रिम्यूनरेशन प्रोग्राम तयार करण्यात आला.
  • कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांमध्ये अधिकाधिक वाढ व्हावी आणि सेवांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी सक्षम आणि एस हे दोन नवीन प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत.
  • क्षमता व प्रगती यांना पाठबळ मिळावे यासाठी क्र्यु व इतर कामांमध्ये ३८०० पेक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती

 

वृद्धी आणि वाणिज्यिक उत्कृष्टता

  • या उद्योगक्षेत्रातील आजवरची सर्वात मोठी ४७० एअरक्राफ्ट्सची मागणी नोंदवली.
  • ११ वाईडबॉडीजसह ३६ लीज्ड एअरक्राफ्ट्ससह ताफ्याच्या विस्ताराचा वेग वाढवला.
  • सर्व मोठी ग्राऊंडेड एअरक्राफ्ट पुन्हा सेवेत आणण्यात आलीत्यांची प्रलंबित विक्री रद्द करण्यात आली.
  • ६ नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरु करण्यात आलेआधीच्या २४ मार्गांवरील फ्रिक्वेन्सी वाढवण्यात आली.
  • एका दिवसात आजवरचा सर्वात जास्त पॅसेंजर रेव्हेन्यूसर्वात जास्त कार्गो रेव्हेन्यूसर्वात जास्त अँसिलियरी रेव्हेन्यू आणि सर्वात जास्त लोड फॅक्टर नोंदवले.
  • एका वर्षभरात रास्कमध्ये (रेव्हेन्यू पर अव्हेलेबल सीट किलोमीटर) १७% ची वाढ.

 

डिजिटल:

  • आयटी यंत्रणा अपग्रेड करण्यासाठी २०० मिलियन यूएस डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येत आहेयामध्ये सीआरएम इंटिग्रेशनसाठी सेल्सफोर्सची अंमलबजावणीओब्सोलेट मेनफ्रेम ते क्लाऊडपर्यंत सॅप ईआरपी सिस्टिमचे अपग्रेडेशनवेबसाईटचे अपग्रेडेशनएम्प्लॉयी सेल्फ-सर्व्हिस सिस्टिम्सलर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम्ससेफ्टी मॅनेजमेंट सिस्टिमवैश्विक दर्जाच्या रोस्टरिंग आणि डे-ऑफ-ओपीएस सिस्टिम्सप्रक्रियांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच क्र्युला अधिक सक्षम बनवण्यासाठी संपूर्ण ताफ्यामध्ये आयपॅड्स देणे.

 

ऑपरेशन्स:

  • गेल्या वर्षभरात संपूर्ण सेक्टरमधील सर्वात सुधारित डोमेस्टिक ऑन-टाइम परफॉर्मन्स (ओटीपी)सातत्यपूर्ण टॉप ३ रँकिंगसह
  • संपूर्ण जगभरात विश्वसनीयता अधिक जास्त वाढावी यासाठी सर्वसमावेशक स्पेयर्स अँड सपोर्ट ऍग्रिमेंट्स करण्यात आली आहेत.
  • ७८७ ची विश्वसनीयता अधिक वाढावी यासाठी बोईंगसोबत परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम करण्यात येत आहे.
  • जवळपास सर्व फर्स्ट आणि बिझनेस क्लास सीट्ससाठी आणि जवळपास ९०% इकॉनॉमी सीट्ससाठी इन-फ्लाईट एंटरटेनमेंट सिस्टिम्स पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.
  • नवीन लोक आणि यंत्रणांसह इंजिनियरिंग फंक्शनची संपूर्णपणे पुनर्बांधणी करण्यात आली आहे.
  • जागतिक दर्जाची विमान सुरक्षा नैपुण्ये आणि व्यवस्था अंमलात आणण्यात आल्या आहेत.
  • जोखमीवर आधारित आयएटीए ऑपरेशनल सेफ्टी ऑडिट यशस्वीपणे करणारी जगातील पहिली एअरलाईन.

 

प्रभाव आणि जबाबदारी:

  • सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल्स (एसएएफ)चा वापर करण्यासाठी सीएसआयआर – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम सोबत समझोता करार करण्यात आला आहे.
  • एएपीए आणि एफआयए यासारख्या उद्योगक्षेत्रातील असोसिएशन्समध्ये सहभागी होण्यासारखेजागतिक विमान उद्योग क्षेत्रासोबत पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याचे उपक्रम
  • १० पेक्षा जास्त कोडशेअर करार तसेच इतर विमान कंपन्यांसोबत भागीदारीविषयक चर्चा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.
  • स्टार अलायन्सआयएटीएफ्लाईट सेफ्टी फाऊंडेशनसोबत सक्रिय संबंध
  • गो ग्रीन – गो पेपरलेस उपक्रम राबवण्यात येत असून त्यामध्ये ई-सिग्नेचरचा देखील समावेश आहे.

 

विहान.एआयचा टॅक्सी टप्पा संपून आता टेक ऑफ टप्पा सुरु होत आहे. टेक ऑफमध्ये योग्य प्लॅटफॉर्म्स उभारणीवर आणि अधिक वेगाने प्रगती करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. या टप्प्यामध्ये एअरएशिया इंडिया आणि एअर इंडिया या समूहातील एअरलाईन्सचे एकत्रीकरण देखील केले जाईल. एलसीसीने त्यांचे प्रमुख रिझर्वेशन प्लॅटफॉर्मवेबसाईट्स आणि ग्राहक संपर्क यंत्रणा यांचे विलीनीकरण यशस्वीपणे केले आहे.  नियामक मंजुरी मिळाल्यानंतर विस्तारा देखील एअर इंडियामध्ये विलीन करण्यात येईल. जागतिक दर्जाची प्रशिक्षण संस्था विकसित केली जाईलएअरलाईनच्या लाईन आणि बेस मेंटेनन्सच्या भविष्यातील दिशा व कॉन्फिगरेशनला आकार दिला जाईल.

विहान.एआय – संस्कृतमध्ये याचा अर्थ आहे एका नव्या युगाची पहाट. यामध्ये एअर इंडियाच्या वाटचालीचा तपशीलवार आराखडा देण्यात आला आहेसर्व टप्पे सुस्पष्टपणे दर्शवण्यात आले आहेतनेटवर्क आणि ताफा यांच्यात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहेग्राहकांसाठी संपूर्णतः सुधारित प्रस्ताव विकसित करण्यात आला आहेविश्वसनीयतासर्व कामे वेळच्या वेळी केली जाणे यामध्ये अधिक जास्त सुधारणा घडवून आणणेतंत्रज्ञानपर्यावरणपूरकतानावीन्य यामध्ये नेतृत्वस्थान मिळवणेउद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम प्रतिभा आपल्याकडे असाव्यात यासाठी महत्त्वाकांक्षी गुंतवणूक या सर्वांवर त्यामध्ये भर दिला जात आहे. शाश्वत वृद्धीलाभदायकता आणि बाजारपेठेतील नेतृत्व या दिशेने एअर इंडियाची वाटचाल होत राहावी हा यामागचा उद्देश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading