Thursday, June 18, 2026
Latest NewsSports

एमईएस क्रिकेट क्लब संघ बाद फेरीत !!

पुणे, ६ एप्रिलः पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत अर्थव शिंदे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एमईएस क्रिकेट क्लब संघाने साईदिप हिरोज्चा ६ गडी राखून पराभव करत सलग तिसर्‍या विजयासह बाद फेरी गाठली.

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना साईदिप हिरोज् संघाने १२७ धावांचे आव्हान उभे केले. सचिन सोळंकी (३६ धावा) आणि आयुष वर्तक (३० धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. एमईएस संघाच्या अर्थव शिंदे याने १९ धावात ४ गडी टिपले. गौरव जोत्शी (२-१९) आणि दिपक डांगी (२-२६) यांनीही दुसर्‍या बाजूने अचूक गोलंदाजी केली. हे आव्हान एमईएस क्रिकेट क्लबने १७.५ षटकामध्ये आणि ४ गडी गमावून पूर्ण केले. कर्णधार अजित गव्हाणे याने नाबाद ३८ धावांची तर, अदवय सिधये याने ३१ धावांची खेळी करून संघाचा विजय साकार केला.

स्पर्धेमध्ये अ गटातून हेज् अँड सॅचे, हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी; ब गटातून माणिकचंद ऑक्सिरीच व न्युट्रीलिशियस;, क गटातून आयोजन पुनित बालन ग्रुप आणि पुणे पोलिस तर, ड गटातून एमईएस क्रिकेट क्लब आणि साईदिप हिरोज् या संघांनी उपांत्यपुर्व फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
साईदिप हिरोज्ः १९.१ षटकात १० गडी बाद १२७ धावा (सचिन सोळंकी ३६, आयुष वर्तक ३०, अर्थव शिंदे ४-१९, गौरव जोत्शी २-१९, दिपक डांगी २-२६) पराभूत वि. एमईएस क्रिकेट क्लबः १७.५ षटकात ४ गडी बाद १२९ धावा (अजित गव्हाणे नाबाद ३८, अदवय सिधये ३१, हर्षित सेठी २-१२); सामनावीरः अर्थव शिंदे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading