fbpx

आता IPL सामन्यांचे समालोचन ऐका मराठीत

आयपीएल २०२३ची धूम आता देशात सर्वत्र पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या यंदाच्या पर्वात कोणता संघ बाजी मारणार याची उत्सुकता भारतातील प्रत्येक क्रीडाप्रेमीमध्ये आहे. क्रिकेटच्या मराठमोळ्या क्रीडाप्रेमींसाठी यंदाचा हंगाम एका वेगळ्याच गोष्टीसाठी खास ठरणार आहे. कारण प्रवाह पिक्चर वाहिनीवर आयपीएल २०२३ क्रिकेट सामन्याचे समालोचन मराठीतून ऐकण्याची संधी मिळणार आहे. प्रवाह पिक्चर वाहिनीवर पहिल्यांदाच आयपीएल सामन्यांचं मराठीतून समालोचन करण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून आयपीएलचा पहिलावहिला सामना मराठीतून अनुभवण्याची अनोखी संधी प्रवाह पिक्चर वाहिनी घेऊन आलीय.

माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, क्रिकेटपटू आदित्य तारे आणि प्रशिक्षक अमोल मुजूमदार यांचं खुमासदार समालोचन या सामन्यांची रंगत वाढणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये रंगणार आयपीएलचा पहिला सामना ३१ मार्चला सायंकाळी ७ वाजल्यापासून फक्त प्रवाह पिक्चरवर.

Leave a Reply

%d bloggers like this: