fbpx

इंदिरा IVF तर्फे PCMC येथे ११६ व्या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन

पुणे: वंध्यत्व उपचार रुग्णालयांची भारतातील सर्वात मोठी साखळी असलेल्या इंदिरा आयव्हीएफने शहरातील पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांच्या नवीन केंद्राचे उद्घाटन केले आहे. संस्थेची पुण्यात आता दोन ठिकाणी केंद्र आहेत. विमान नगरमधील केंद्राच्या जोडीला  शहरातील जोडप्यांना सुलभ जावे यासाठी ओपीडी असलेल्या नवीन केंद्राची ही भर आहे.  

उच्च यश दर, रुग्णकेंद्रित दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान-आधारित उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेने महाराष्ट्रातील आपल्या १९ व्या केंद्राचे उद्घाटन केले. हे भारतातील ११६ वे केंद्र आहे. इंदिरा आयव्हीएफने गेल्या दशकात एक लाखाहून अधिक जोडप्यांना गर्भधारणेसाठी मदत केली असून त्यापैकी १९,००० जोडप्यांवर पुण्यात उपचार करण्यात आले आहेत. देशभरातील आणि महाराष्ट्रातील जोडप्यांना पुराव्यावर आधारित उपचारांची खात्री देण्यासाठी लाइफ व्हिस्पररच्या सहकार्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह अनेक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केली आहे.

याप्रसंगी बोलताना इंदिरा आयव्हीएफचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक डॉ. नितीज मुर्डिया म्हणाले, “कुटुंब विस्तार करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना मदत करण्यासाठी पुण्यातील  आमच्या केंद्रात भर घालत पिंपरी-चिंचवडध्ये अत्याधुनिक सुविधांची ओपीडी सुरू करताना  आम्हाला आनंद होत आहे. आकडेवारीनुसार १०-१५% भारतीय जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. अशा जोडप्यांना या संदर्भातील गैरसमजुती दूर करत योग्य माहिती देऊन मदत करणे हे इंदिरा आयव्हीएफचे ध्येय आहे. मूल नसणं या गोष्टीमुळे एखाद्या जोडप्याच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो याची आम्हाला जाणीव असल्यामुळे एकाच छताखाली उपाय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

“नवीनतम राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की भारतातील एकूण प्रजनन दर (TFR) प्रथमच प्रति महिला २ मुलांच्या बदली पातळीच्या खाली घसरला आहे. महाराष्ट्रात २०१५-१६ मधील १.९ वरुन टीएफआर दर २०१९-२० मध्ये १.७ पर्यंत कमी झाला आहे आणि खरं तर, शहरी भागात ही संख्या १.५ पर्यंत खाली आली आहे. राज्यात उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची उच्च पातळी आणि अशक्तपणा असलेल्या व्यक्तींची वाढती संख्या

या गोष्टींशी याचा मागोवा घेतला जाऊ शकतो. पालक बनण्याच्या एखाद्याच्या आकांक्षेला यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो,” असेही ते पुढे म्हणाले.  

या प्रदेशातील वंध्यत्वाच्या ओझ्याबद्दल बोलताना इंदिरा आयव्हीएफ पुणेचे डॉ. अमोल लुंकड म्हणाले, “सहापैकी एका जोडप्याला मूल होणे कठीण होत असल्याचे आढळून आले आहे. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की वंध्यत्व पुरुष किंवा स्त्रिया आणि काही जणांच्या बाबतीत दोघांमध्येही असलेल्या विशिष्ट परिस्थितीमुळे येऊ शकते. सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही योग्य उपाय सुविधा पुरविते आणि त्यांना पालकत्वाच्या प्रवासात संपूर्ण पाठबळ देते.”

आयव्हीएफ प्रक्रियेविषयी माहिती देताना, इंदिरा आयव्हीएफ  पिंपरी-चिंचवडच्या डॉ. इशिता लुंकड म्हणाल्या, “आयव्हीएफ उपचार सुरू करण्यापूर्वी जोडप्याला विविध पर्याय आणि परिणामांबद्दल समुपदेशन केले जाते. त्यानंतर वंध्यत्वाचे कारण शोधण्यासाठी आणि उपचार कशा प्रकारे करायचे हे ठरविण्यासाठी दोघांची चाचणी केली जाते. ओव्हरीयन स्टीम्युलेशन,  oocyte संकलन, वीर्य संकलन, फर्टीलायझेशन, भ्रूण व्हिज्युअलायझेशन, भ्रूण हस्तांतरण आणि शेवटी गर्भधारणा चाचणी या सर्व महत्त्वाच्या पायऱ्या आहेत ज्या आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान पार पाडल्या जातात.”

अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज असे इंदिरा आयव्हीएफ असंख्य जोडप्यांना वंध्यत्वाच्या अनेकदा गुंतागुंतीच्या प्रवासात मार्गदर्शन करते आणि शेवटी त्यांचे एकत्रितपणे कुटुंब विस्तार करण्याचे स्वप्न साकार करण्यात मदत करते. त्याच बरोबर येथे समुपदेशन देखील केले जाते.  तसेच अंडी आणि शुक्राणू गोठविण्याची सुविधा देखील पुरविली जाते. चाळीशीच्या सुरुवातीपर्यंत कुटुंब नियोजन करण्याचा निर्णय घेतलेल्या अनेक तरुण पुरुष आणि महिलांसाठी तर हे वरदान आहे. आतापर्यंत, इंदिरा आयव्हीएफने आपल्या ११६ केंद्रांमधून यशस्वी गर्भधारणा झालेल्या १००,००० जोडप्यांना मदत केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: