स्केलरकडून बेंगळुरूमध्ये पहिल्या कॅम्पससह कम्प्युटर सायन्स मधील ४ वर्षांचा निवासी यूजी प्रोग्राम लाँच
बेंगळुरू : स्केलर (इंटरव्ह्यूबीटद्वारे) या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या स्टार्ट-अप ने आज ४ वर्षांचा निवासी अंडरग्रॅज्युएट कम्प्युटर सायन्स प्रोग्राम स्केलर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी (Scaler School of Technology) च्या लाँचची घोषणा केली. हा प्रोग्राम भारतातील सॉफ्टवेअर व्यावसायिकांच्या भावी पिढीसाठी उच्च शिक्षणामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी डिझाइन व वितरित करण्यात आला आहे.
तीन टप्प्यांमध्ये वितरित करण्यात आलेल्या या प्रोग्रामच्या पहिल्या १८ महिन्यांमध्ये वास्तविक जीवनातील केसेससह अध्यापन करत वि़द्यार्थ्यांना कम्प्युटर सायन्स मुलभूत गोष्टींमध्ये निपुण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल, ज्यानंतर आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांकडून एक वर्ष सशुल्क इंडस्ट्री इंटर्नशिप आणि उद्योग दिग्गजांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन यांचा समावेश असेल. शेवटच्या १८ महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांना अल्गोरिदम ट्रेडिंग किंवा कौशल्ये अवगत करत वरिष्ठ अभियंते आणि मशिन लर्निंग/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभियंते म्हणून विशेषज्ञ बनण्यास साह्य करण्यात येईल, ज्यामुळे पदवीधरांना जगातील अव्वल ०.१ टक्के कंपन्यांमध्ये त्यांचे करिअर घडवण्यास मदत होईल. या प्रोग्रामचा प्रोग्राममध्ये सामील होण्याच्या अडीच वर्षांमध्ये बॅचच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट ऑफर (पीपीओ) देण्याचा देखील मनसुबा आहे. स्केलरने मेरिट-आधारित स्कॉलरशिप प्रोग्राम देखील तयार केला आहे, ज्यामधून प्रत्येक पार्श्वभूमीमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध होते आणि उच्च स्पर्धात्मक व भविष्यासाठी सुसज्ज सॉफ्टवेअर टेक व्यावसायिक बनण्यास मदत होते.
स्केलरच्या अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम इन सॉफ्टवेअर डेव्हलमेंटमधील विद्यार्थी भागीदार संस्थेच्या माध्यमातून यूजीसीद्वारे मान्यताप्राप्त बॅचलर ऑफ सायन्स (बी. एससी.) इन कम्प्युटर सायन्समध्ये नावनोंदणी करण्यास पात्र असतील. ही पदवी विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांसाठी किंवा भारतीय आणि परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्ज करू इच्छित असल्यास सक्षम करेल. याव्यतिरिक्त, त्यांना वुल्फ युनिव्हर्सिटीकडून मास्टर ऑफ सायन्स इन कम्प्युटर सायन्सचे शिक्षण देखील मिळेल. वुल्फ युनिव्हर्सिटीला युरोपियन युनियनमधील उच्च शिक्षण संस्था म्हणून परवाना देण्यात आला आहे आणि ईसीटीएस – युरोपियन क्रेडिट ट्रान्सफर सिस्टमवर कार्य करते. वुल्फने दिलेली पदव्युत्तर पदवी जागतिक स्तरावर ओळखली जाते, जिला ईसीएस व सीईएसकडून मान्यता मिळाली आहे.
स्केलर व इंटरव्ह्यूबीटचे सह-संस्थापक अभिमन्यू सक्सेना म्हणाले, ‘‘गेल्या चार वर्षांपासून स्केलरने मशिन लर्निंग, डेटा सायन्स व एआय यासंदर्भात दिलेल्या अल्पकालीन अपस्किलिंग कोर्सेसने हजारो तरूण व्यावसायिकांच्या करिअरमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आम्ही देशातील सध्याच्या इतर कोणत्याही ४ वर्षांच्या यूजी सीएस प्रोग्राम्सच्या तुलनेत सर्वोत्तम निकाल दिले आहेत. जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील स्केलरच्या ३५,००० यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी आम्हाला यूजी शिक्षण क्षेत्रात प्रवेश करण्याचा आणि सर्व भागधारकांसाठी परिणाम देणारे मुलभूत बदल घडवून आणण्याचा आत्मविश्वास दिला.’’
स्केलर व इंटरव्ह्यूबीटचे सह-संस्थापक अभिमन्यू सक्सेना पुढे म्हणाले, ‘‘अध्ययनाच्या बाबतीत प्रत्येकजण अद्वितीय असतो या विश्वासासह स्केलरची निर्मिती करण्यात आली. पूर्णत: प्रमाणित व सिद्धांत-युक्त शिक्षण उपयुक्त ठरणार नाही. स्केलर विश्वामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना वैयक्तिक इंडस्ट्री मेन्टोर मिळतो, जो प्रत्येक महिन्याला त्यांच्यासोबत वेळ व्यतित करत त्यांचे करिअर व विचार प्रक्रिया घडवतो, ज्याला कोणीही उच्च शिक्षण मिळण्यापासून वंचित न राहण्याच्या खात्रीसाठी जबाबदार असलेल्या बॅच यशस्वी व्यवस्थापकांचा पाठिंबा मिळतो. स्केलर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी देखील याच तत्त्वावर काम करेल.’’
फिक्कीने (FICCI) नुकतेच आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये नीति आयोगचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमिताभ कांत यांनी संक्षिप्तपणे उद्योग-शैक्षणिक सहयोगाचा अभाव दाखवून दिला (highlighted), ज्यामधून विद्यमान युनिव्हर्सिटी अभ्यासक्रमामध्ये मोठी कमतरता असल्याचे दिसून आले. देशाला दोन गोष्टींची नितांत गरज आहे, पहिली म्हणजे लाखो तरूण व महत्त्वाकांक्षी भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्यांना जागतिक दर्जाचे करिअर देण्याची क्षमता असलेले उच्च दर्जाचे कम्प्युटर सायन्स यूजी प्रोग्राम आणि दुसरी म्हणजे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रासाठी उच्च शिक्षित कुशल कर्मचारीवर्गाची बारमाही श्रेणी प्रदान करणे. भारतातील या दोन आवश्यक आणि दीर्घकाळापासून पूर्ण न झालेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी स्केलर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना करण्यात आली आहे.
दरवर्षी भारतातील रोजगार बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या १६ लाख अभियांत्रिकी पदवीधरांपैकी फक्त १६ टक्के पदवीधरांना नोकरी मिळते, ज्यापैकी ८० टक्के कम्प्युटर सायन्स नोकऱ्या आहेत. यापैकी फक्त २ टक्के पदवीधरांना प्रामुख्याने कम्प्युटर सायन्सशी संबंधित वर्षाला ८ लाख रूपयांहून अधिक पगार देणारी नोकरी मिळते. पुरवठा संदर्भातील आव्हान देखील तितकेच विसंगत आहे. २३ शहरांमधील आमचे करदाते अनुदानित अग्रगण्य अभियांत्रिकी कॉलेज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) यांसारखे दर्जेदार एज्युकेटर्स वर्षाला ५०० हून कमी कम्प्युटर सायन्स सीट्स देतात आणि त्यांचा १०० टक्के प्लेसमेंट दर नाही. उरलेल्यांना यूजी इकोसिस्टमशी जोडले पाहिजे, जे अपूर्णरित्या प्रशिक्षित शिक्षकांद्वारे देण्यात आलेल्या कालबाह्य अभ्यासक्रमामुळे आणि विद्यार्थ्यांसाठी किंवा मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरिता गुंतवणूक करणाऱ्या पालकांसाठी अपेक्षित निकाल न देणाऱ्या दरामध्ये उद्योग-संबंधित शिक्षण व प्रशिक्षण देण्यामध्ये क्वचितच सुसज्ज आहेत. दुसरीकडे सॉफ्टवेअर इंजीनिअरिंगमधील उच्च दर्जाच्या नोकऱ्यांना अत्यंत उच्च मागणी आहे आणि कायम राहिल. कोर्सेरा (Coursera) ने अंदाज वर्तवला आहे की, पुढील १० वर्षांत सॉफ्टवेअर इंजीनिअरिंगमध्ये ९ करोड नवीन नोकऱ्या असतील. पण भारतातील कम्प्युटर सायन्ससाठी यूजी प्रोग्राम्स अत्यंत निम्न दर्जा पदवीधरांना उत्तम पगार असलेल्या नोकऱ्या शोधण्यासाठी अभ्यासक्रमापलीकडे शिकण्यास भाग पाडत आहेत. स्केलर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी (Scaler School of Technology) या सर्व समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्याची अपेक्षा आहे.
स्केलर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या ४ वर्षाच्या निवासी अंडरग्रॅज्युएट प्रोग्रामची ठळक वैशिष्ट्ये-
• डेटा सायन्स, मशीन लर्निंग, अल्गोरिदमिक ट्रेडिंग आणि स्पर्धात्मक प्रोग्रामिंग यांसारख्या आधुनिक मागणीदायी तंत्रज्ञानामध्ये स्पेशलायझेशन ऑफर करते
• आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांकडून १ वर्ष सशुल्क इंडस्ट्री इंटर्नशिपसह उद्योगातील मेन्टोर्सकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन
• अत्याधुनिक गेमिफाई अध्ययन व्यासपीठ – रिअल-टाइम लर्निंग ट्रॅकर
• स्केलरच्या करिअर भागीदारांसोबत सहयोगाने वास्तविक-जगातील हॅकेथॉनवर विचारमंथन
• उद्योग प्रमुख/सीटीओंकडून फायरसाइड चॅट्स व मार्गदर्शन
• गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, ओला, उबर येथील टॉप टेक दिग्गजांकडून शिक्षण
• इंटर्नशिपदरम्यान उद्योग प्रमुखांकडून १:१ मार्गदर्शन
स्केलर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी ऑल-वर्क-नो-प्ले संस्था नसेल. विद्यार्थी अत्याधुनिक कॅम्पसमध्ये अपेक्षित अनुभवांसह कॅम्पस् इव्हेण्ट्स, फेस्ट्स आणि सर्व आधुनिक सुविधा जसे जिम्स, क्रीडा, लायब्ररीज, लॉण्ड्री, वैद्यकीय सुविधा व सुरक्षितता मिळण्यासह संपन्न जीवन जगतील. भारतातील सिलिकॉन व्हॅली, बेंगळुरू येथे स्थित ४ वर्षांचा निवासी प्रोग्राम विद्यार्थ्यांना दर तिमाहीला किमान एकदा उद्योगातील प्रमुखांना भेटण्याची संधी देईल. स्केलर इंटरनॅशनल स्तरावर ९०० हून अधिक नियोक्ते-भागीदारांसह काम करते, ज्यामध्ये प्रत्येक तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल कंपन्यांचा समावेश आहे, जसे गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, फेसबुक, झोमॅटो, एअरटेल, वेल्स फार्गो, पेपल, जे नियमितपणे स्केलर माजी विद्यार्थ्यांची नियुक्ती करतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, बेंगळुरूचे अनोखे कॉस्मोपॉलिटन लोकांनी निर्माण केलेले उत्तेजनपर सामाजिक जीवन हे स्केलरच्या विद्यार्थ्यांकरिता शिकण्यासाठी, विकसित होण्यासाठी आणि आरोगयदायी जीवन जगण्यासाठी एक परिपूर्ण सेटिंग असेल. २०० सीट्स देणार्या नवीन यूजी प्रोग्रामची पहिली बॅच १८ जुलै २०२३ रोजी सुरू होईल.
