Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

अहिल्यादेवीत शाळेत प्रदर्शन

पुणे – डीईएसच्या अहिल्यादेवी शाळेत व्यावसायिक अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींनी बनविलेल्या विविध कलाकृतींचे ‘स्वच्छंद’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यवाह धनंजय कुलकर्णी आणि सदस्या प्राजक्ता प्रधान मुख्याध्यापिका अनघा डांगे, उपमुख्याध्यापिका स्वाती मिश्रा, पर्यवेक्षिका चारुता प्रभुदेसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुंटे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत डीईएसच्या माध्यमिक शाळांमध्ये या वर्षीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जातात. विद्यार्थ्यांचे कौशल्य गुण विकसित करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहेत.

हेमंत खळदकर, मेघना रत्नपारखी, आदिश्री भावे, मानसी देशपांडे, विद्या जितुरी, मोहन देशमुख, सुवर्णा परदेशी, सीमा डोईफोडे यांनी संयोजन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading