fbpx

Baichung Bhutia Football School : फुटबॉलपटूंसाठी निवड चाचणीचे आयोजन

पुणे :- बायचुंग भुतिया फुटबॉल स्कुलने आपल्या निवासी अकादमींसाठी पुण्यात चाचणी सत्राचे आयोजन केले आहे. हे चाचणी सत्र २ एप्रिल २०२३ रोजी हॉटफुट बावधन, येथे सकाळी ८.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. १ जानेवारी २००६ ते ३१ डिसेंबर २०१३ दरम्यान जन्मलेले खेळाडू या चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत.

तसेच युवा फुटबॉलपटूंनी या चाचणीसाठी त्यांचे किट व सोबत वैध सरकारी ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे. इच्छुक हे अधिक माहितीसाठी सिद्धार्थ रावत यांच्याशी ७५७४९८०८६७ या क्रमांकवर संपर्क करू शकतात. शिवाय एनजोगो या अॅपवरून ही चाचण्यांसाठी इच्छुक ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

बायचुंग भुतिया फुटबॉल स्कूल् ही भारतातील सर्वात मोठी फुटबॉल अकादमी आहे. तिच्या निवासी कार्यक्रमांतर्गत प्रतिभावान फुटबॉलपटूंसाठी रुपये २ कोटींहून अधिकची शिष्यवृत्ती ही प्रदान केली जाते.

Leave a Reply

%d bloggers like this: