Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘ठरलं तर मग’ मालिकेने गाठला १०० भागांचा टप्पा

महाराष्ट्राची नंबर वन मालिका ‘ठरलं तर मग’ने अप्लापवधितच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी ठरलं तर मग मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. कलाकारांनी केक कापून या यशाचा आनंद साजरा केला.

या खास प्रसंगी आनंद व्यक्त करताना जुई गडकरी म्हणाली, ‘मला सायली या भूमिकेसाठी विचारणा झाली तो दिवस मी कधीच विसरु शकत नाही. तो पहिला कॉल आज खुप आठवतोय. त्या एका कॉलने माझं आयुष्य बदललं. माझं हे कुटुंब १०० भागांचं  झालं आहे. आज फक्त आणि फक्तं आभार मानते त्या सगळ्यांचे ज्यांनी विश्वास ठेऊन जुईला ‘सायली’ दिली. ही मालिका माझ्यासाठी खुप जास्तं जवळची आहे कारण एका मोठ्या आजारपणातून बाहेर पडताना या मालिकेने मला आपलसं केलं. मी आज एक वेगळं आयुष्य अनुभवतेय. या सेटवर आणि या मालिकेसाठी काम करणाऱ्या प्रत्येकामध्ये इतकी सकारात्मकता भरलेली आहे की मला परत मागे वळून बघायचच नाही. मी फक्त ऋणी आहे त्या सगळ्यांची ज्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही. मला नेहमी आत्मविश्वास दिला की मी करु शकेन. तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा नेहमी पाठीशी असुदे.

सायली आणि अर्जुनच्या नात्यातले बरेचसे पैलू मालिकेच्या यापुढील भागांमधून उलगडणार आहेत. त्यासाठी न चुकता पाहा ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading