fbpx

संतोष घुले यांचा ‘हिंदुस्तानरत्न राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मान

पिंपरी : डायनॅमिक युथ स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने देण्यात येणारा ‘हिंदुस्तानरत्न राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा बोपखेल येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष घुले यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
 संस्थेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. संतोष घुले यांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात, तसेच कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेऊन या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यावेळी डॉ. संजय मोरे, जयश्री चौगुले, उद्योजक कमलेश घुले, सामाजिक कार्यकर्ते चंदन राऊत आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

%d bloggers like this: