आयआयएचएम तर्फे पुण्यात इन्स्टिट्यूट ऑफ पेस्ट्री ॲन्ड कुलिनरीची सुरुवात
पुणे : बंगलोर मध्ये पहिल्या संस्थेच्या यशस्वी सुरुवातीनंतर आता आयआयएचएम इन्स्टिट्यूट ऑफ पेस्टरी ॲन्ड कुलिनरी (आयआयपीसी) ची सुरुवात नुकतीच ‘दख्खनची राणी’ म्हणून ओळखल्या जाणार्या पुण्यात दुसरी शाखा सुरु करण्यात आली आहे. आयआयपीसी पुणे येथे या संस्थेची सुरुवात इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट च्या वर्ल्ड कॅम्पस म्हणजेच विमान नगर येथील कॅम्पस मध्ये करण्यात आली. १५ मार्च २०२३ रोजी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ला ३० वर्षे पूर्ण होत आहेत याचे औचित्य साधून आता शहर आणि देशभरांतील उदयोन्मुख पेस्ट्री आणि बेकरी शेफ्स साठी एक नवीन अध्याय सुरु करण्यात आला आहे.
या विश्वस्तरीय पेस्ट्री स्कूल चे प्रमुख म्हणून प्रसिध्द पेस्ट्री तज्ञ, बेल्जियन चॉकलेट कंपनी कॅलेबॉट तसेच लीला पॅलेस, हॉटेल्स ॲन्ड रिसॉर्ट्स चे माजी कॉर्पोरेट पेस्ट्री शेफ अविजीत घोष काम पाहणार आहेत. इन्स्टिट्यूट तर्फे पेस्ट्री ॲन्ड कुलिनरी आर्ट्स क्षेत्रातील नवोदित शेफ्स, बेकर्स, पेस्ट्री मेकर्स आणि खाद्य क्षेत्रात व्यावसायिक पणे काम करुन त्यांची कौशल्ये पुढील स्तरावर नेण्यासाठी इच्छुक लोकांना विश्वस्तरीय शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याच्या अभ्यासक्रमाचे डिझाईन अशा प्रकारे करण्यात आले आहे ज्यायोगे त्यांना बेकरी आणि डेझर्ट्स साठी आवश्यक पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासा बरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान उपलब्ध करुन दिले जाईल.
आयआयपीसी बंगलोरची सुरुवात केल्या पासून वर्षभरात संस्थेने बंगलोर मधील एक आघाडीची पेस्ट्री आणि कुलिनरी इन्स्टिट्यूट म्हणून नाव प्राप्त केले आहे. आयआयपीसी पुणे सुध्दा याच पध्दतीने काम करुन महाराष्ट्राच्या शैक्षणिक राजधानीत आपले योगदान देणार आहे. संस्थे कडून विकेंड कोर्सेस व्यतिरिक्त अनुक्रमे नऊ महिने आणि सहा महिन्याचे पेस्ट्री तील सर्टिफिकेट कोर्सेस प्रदान केले जाणार आहेत. आयआयपीसी पुणे येथे अद्ययावत अशा उपकरणां बरोबरच पेस्ट्री लॅब आणि प्रात्यक्षिकांसाठी किचनही उपलब्ध आहे. या कोर्सेस चे प्रशिक्षण हे अनुभवी पेस्ट्री शेफ्स कडून करण्यात येणार असून यांत आंतरराष्ट्रीय स्तरावरील फॅकल्टी जसे शेफ साराह हार्टनेट्ट या शेफ अविजित घोष यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील.
आयआयएचएम चा असा विश्वास आहे की हॉस्पिटॅलिटी उद्योगात कुशल अशा पेस्ट्री शेफ्स आणि कुलिनरी व्यावसायिकांची मागणी सातत्याने वाढत आहे. पुण्यातील वाढती हॉटेल्स, रेस्तराँ आणि कॅफेजची संख्या लक्षात घेता उच्च गुणवत्तेने युक्त डिशेस आणि मिठाई उपलब्ध करुन देणार्या प्रशिक्षित व्यावासयिकांची गरज वाढू शकेल. इन्स्टिट्यूट कडून हीच गरज पूर्ण करण्यासाठी नवोदित शेफ्स आणि पेस्ट्री निर्मात्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पुण्यातील कुलिनरी क्षेत्राच्या क्षितीजावर मोठा बदल घडवण्यासाठी प्रयत्न करुन मोठा बदल घडवण्याची अपेक्षा संस्थापकांकडून व्यक्त करण्यात येत असून यामुळे नवोदित शेफ्स आणि पेस्ट्री उत्पादकांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवून त्यांना उद्योगात यशस्वी करण्यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी बोलतांना शेफ अविजित घोष यांनी सांगितले “आयआयपीसी ही एक अनोखी आणि नाविन्यपूर्ण संस्था आहे. चॉकलेट तयार करण्यास उत्सुक विद्यार्थ्यांना विविध प्रकारची चॉकलेट्स आणि पेस्ट्रीज तयार करण्यासाठी खूप प्रोत्साहक गोष्टी येथे प्राप्त होतील.”
आयआयएचएम चे चेअरमन आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुब्रोनो बोस यांनी सांगितले “ सुंदर शहर असलेल्या शहरात आयआयपीसीची स्थापना करतांना आम्ही खूपच उत्साही आहोत. शहरातील पाकशास्त्राच्या शिक्षणात नवीन आयाम जोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आंम्हाला असे वाटले की पुण्यात जागतिक स्तरावरील, अद्ययावत पेस्ट्री इन्स्टिट्यूट सुरु करावी आणि याचसाठी आयआयपीसी आहे. आयआयपीसीचे दुसरे कॅम्पस येथे सुरु करतांना आंम्हाला आनंद होत आहे.”