fbpx

६७% गुंतवणूकदार बेंचमार्क निर्देशांकाला मागे टाकण्यात अयशस्वी ठरले आहेत

मुंबई भारतीय भांडवली बाजार आणि गुंतवणूकदारांच्या वर्तनावरील एका नावीन्यपूर्ण अशा सर्वेक्षणानुसार, ६७% शेअर बाजारातील सहभागी बेंचमार्क मार्केट इंडेक्सला मागे टाकण्यात अयशस्वी ठरले आहेत. चिंताजनक अशा ट्रेंडमध्ये बहुतेक भारतीय गुंतवणूकदार आणि व्यापारी अगदी बेंचमार्कच्या सुरुवातीचा परतावा निर्माण करण्यास ही अक्षम आहेत. याची वेगवेगळी करणे दिली जाऊ शकतात जसे की, व्यापार प्रणालीचा अभाव, कार्यक्षमतेच्या मोजमापातील चुका, लोभ आणि भीतीपोटी, भावनेच्या आहारी जाऊन कृती करणे, मिळणाऱ्या टिप्स किंवा आर्थिक व्यवहारासंबंधीच्या प्रभावकांवर (फिन्फ्लूएन्सर) अवलंबून राहणे जास्त फायद्याचाच केवळ विचार करणे इत्यादी. वर नमूद केलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी भारतातील एका आघाडीची गुंतवणूक-टेक कंपनी  सॅम्को (SAMCO) गुंतवणूकदारांना आणि व्यापाऱ्यांना देशव्यापी ‘Mission-Ace the index’ मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करते, ज्याचा उद्देश भारतीयांमध्ये उत्कृष्ट कामगिरीची संस्कृती निर्माण करणे आहे.

     सॅम्को (SAMCO) ने जागतिक पातळीवर ग्राहक अंतर्दृष्टी, डेटा आणि अॅना लिटिक्स फर्ममध्ये अग्रगण्य असलेल्या निल्सेन या कंपनीला भारतीय भांडवली बाजार आणि गुंतवणूकदार वर्तनाचे आपले नावीन्यपूर्ण असे सर्वेक्षण दिले. हे सर्वेक्षण दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळूर, पुणे, सूरत, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई आणि जयपूर या १० प्रमुख शहरांमध्ये करण्यात आले असून २४ ते ४५ वर्षे वयोगटातील अंदाजे २००० गुंतवणूकदार आणि व्यापऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. या सर्वेक्षणात काही मनोरंजक निष्कर्ष दिसून येतात:

  • ६७% शेअर बाजारातील सहभागी बेंचमार्क निर्देशांक परताव्या एवढे देखील उत्पन्न मिळवू शकत नाहीत.
  • ६५% गुंतवणूकदारांना त्यांच्या नेमक्या शेअर बाजारातील परताव्याची माहिती नसते.
  • ७७% गुंतवणूकदारांना याची जाणीव ही नसते की त्यांना सातत्याने बेंचमार्क निर्देशांकांवर मात करणे आवश्यक आहे.

मर्यादित २३% गुंतवणूकदारांपैकी ज्यांना जाणीव आहे की त्यांना बेंचमार्क निर्देशांकांवर मात करायची आहे; ५०% पेक्षा जास्त लोकांना बेंचमार्क निर्देशांकांना कसे मागे टाकायचे याबद्दल कोणतीही महत्वकांक्षा किंवा कल्पना नाही.

  • ६३% गुंतवणूकदार लक्ष्य देखील करत नाहीत किंवा निर्देशांकांना मागे टाकण्याची कोणतीही योजना करत नाहीत.

सॅम्को (SAMCO) शेअर बाजारातील सहभागींना ‘Mission-Ace the index’ मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करते आणि गुंतवणूक कामगिरीला प्राधान्य देण्याची शपथ घेते. सॅम्को (SAMCO) गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या संधींचे संशोधन आणि विश्लेषण करून, पोर्टफोलिओ सक्रियपणे व्यवस्थापित करून आणि विकसित बाजार परिस्थितीनुसार धोरणे जुळवून घेऊन संबंधित बेंचमार्क निर्देशांकांपेक्षा अधिक कामगिरी करण्याचे आवाहन करते. आणि जर एखादी व्यक्ति त्याचा/ तिचा पोर्टफोलिओ सक्रियपणे व्यवस्थापित करू शकत नसेल तर ती ज्याचा बाजारात उत्कृष्ट परतावा देण्याचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड आहे अश्या एखाद्या व्यावसायिक फंड व्यवस्थापकाकडे निधी आउटसोर्स करण्याचे वचन देईल किंवा अशा इंडेक्स ईटीएफ मध्ये गुंतवणूक करेल जे ती व्यक्ती  बाजारातील एकूण कामगिरी आणि त्याच्या वाढीपासून होणारे फायदे यांच्याशी संरेखित आहे का याची खात्री करण्यासाठी संबंधित बेंचमार्क्स ट्रॅक करेल.

सहभागी https://acetheindex.com/ या संकेत स्थळावर शपथ घेऊ शकतात.

     या घोषणेवर भाष्य करताना सॅम्को (SAMCO) चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  जिमीत मोदी म्हणाले, “उत्कृष्ट कामगिरीची संस्कृती  निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे आणि आता आमच्याकडे मिशन आहे Ace the index. वैयक्तिक शेअर बाजारातील सहभागींनी त्यांची ट्रेंडिंग खाती अशा रीतीने चालवली पाहिजे जिथे त्यांनी बेंचमार्क निर्देशांकांपेक्षा सातत्याने पुढे जाणे आवश्यक आहे. किंवा या ऐवजी त्यांनी सक्रिय ट्रेडिंग थांबवावे कारण त्यांना केवळ इंडेक्स फंड मध्ये किंवा वेवसईक फंड व्यवस्थापकाला आउटसोर्स करून अधिक चांगले आर्थिक परिणाम मिळण्याची शक्यता जास्त आहे.”

जिमीत मोदी पुढे म्हणाले, “म्युच्युअल फंडामध्ये कामगिरीचे मापन, अहवाल आणि बेंचमार्किंग बऱ्यापैकी चांगले केले जाते. सेबीने १ एप्रिल पासून पीएमएस साठी तशी शिफारसही केली आहे. तरीही, वैयक्तिक रिटेल गुंतवणूकदार स्वतःचे वित्तव्यवस्थापक (मनी मॅनेजर) असूनही त्यांच्या कार्यक्षमतेचे मोजमाप खूपच खराब आहे. याचे निराकरण करण्यासाठी बाजारातील सहभागींना त्यांची सर्वोत्तम आर्थिक कामगिरी साध्य करत यावी म्हणून वेब आणि अॅपवर आमचे नेक्स्ट-जेन कॅपिटल रिसोर्स प्लॅनिंग (सीआरपी) प्लॅटफॉर्म सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”

     वेब आणि अॅपवरील आमचे नेक्स्ट-जेन कॅपिटल रिसोर्स प्लॅनिंग (सीआरपी) प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांना केवळ ट्रेडिंग करायला आणि सुलभतेने गुंतवणूक करण्यास मदत करेल असे नाही तर त्यांचा स्वतःचा वैयक्तिक निर्देशांक देखील तयार करेल जो रिअल टाइम गुंतवणुकीचा परतावा ट्रॅक करेल आणि अनेक टाइम फ्रेमस् मधील जे आघाडीचे विस्तृत बाजार निर्देशांक आहेत त्यांच्या तुलनेत गुंतवणूकदाराच्या कामगिरीचे बेंचमार्क देखील करेल. गुंतवणूकदार अग्रगण्य सक्रिय फंड व्यवस्थापकांच्या तुलनेत त्यांची कामगिरी बेंचमार्क करू शकतात.

     जे सॅम्को (SAMCO) चे गुंतवणूकदार आधीपासूनच नेक्स्ट-जेन कॅपिटल रिसोर्स प्लॅनिंग (सीआरपी) प्लॅटफॉर्मवर आहेत त्यांची अंतर्गत डेट सेट असे सुचविते की, ३२% गुंतवणूकदारांनी कॅलेंडर वर्ष २०२२ मधील चौथ्या तिमाही साठी बेंचमार्क निर्देशांकांवर मात केली, त्याच कालावधीमध्ये निफ्टी (NIFTY) ने ७.७५% परतावा दिला.

 

Leave a Reply

%d bloggers like this: