fbpx

पार्किंग उपाय प्रदान करण्यासाठी एअरॲटिक्स ने ओरिक्स आणि महिंद्रा फर्स्ट चॉईस बरोबर केली भागीदारी

पुणे – एअरॲटिक्स या अनोख्या अशा एन्ड टू एन्ड स्टोअरेज आणि पार्किंग सोल्युशन्स उपलब्ध करुन देणार्‍या अनोख्या मार्केटप्लेस ने आज जपानी कार लिझींग कंपनी असलेल्या ओरिक्स आणि प्री ओन्ड कार्सची विक्री करण्यात आघाडीवर असलेल्या महिंद्रा फर्स्ट चॉईस बरोबर भागीदारी केल्याची घोषणा केली. ओरिक्स कडून एअरॲटिक्स च्या मंचाचा उपयोग करुन विविध शहरांत त्यांच्या गाड्या पार्क करण्यासाठी पार्किंगच्या जागा शोधण्यात येणार आहेत तर दुसरी कडे महिंद्रा फर्स्ट चॉईस ने एअरॲटिक्स च्या होस्ट सेंट्रिक मंचाचा वापर करुन त्यांच्या नियोजित ग्राहकांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. एअरॲटिक्स चे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युझर फ्रेंडली मंच उपलब्ध झाल्याने महिद्रा फर्स्ट चॉईसचे पार्किंग स्पेस नेटवर्क आता भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. एअरॲटिक्स चे ग्राहक आता या मंचाचा उपयोग करुन पार्किंगची जागा शोधू आणि बुक करु शकतील.

ओरिक्स ही भारतात प्रसिध्द कार लिझींग कंपनी असून कंपनी कडून एअरॲटिक्स  च्या मंचाचा उपयोग करुन बंगळूरु, चेन्नई, मुंबई आणि पुणे या चार शहरांतील पार्किंग स्पेसचे बुंकिंग केले आहे.  महिंद्रा फर्स्ट चॉईस कडे त्यांचे स्वत:चे असे पार्किंग यार्ड्स असून ते भारतातील १६ शहरांत आहे, त्यांनी आता ही यार्ड्स उपलब्ध करुन दिली असून आता पार्किंग स्पेस शोधणारे ग्राहक आता एअरॲटिक्स च्या मंचाचा उपयोग करुन सुरक्षित पार्किंग स्पेस प्राप्त करु शकतील.

या भागीदारी विषयी बोलतांना एअरॲटिक्स चे संस्थापक आणि सीईओ आदित्य काळे यांनी सांगितले “  ओरिक्स आणि महिंद्रा फर्स्ट चॉईस सारख्या आघाडीच्या ब्रॅन्ड्स बरोबर सहकार्य करतांना आम्ही खूपच उत्साही आहोत. आम्ही त्यांना अजोड आणि समस्यामुक्त पार्किंग अनुभव प्राप्त करुन देऊ.  आमच्या ग्राहकांना सर्वसमावेशक स्टोअरेज आणि पार्किंग उपाय एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. आधुनिक तंतज्ञानाचा वापर करुन ग्राहक आता पार्किंग आणि स्टोअरेज स्पेसेस सहज बुक करु शकतील आणि समस्यामुक्त असा अनुभव प्राप्त करु शकतील.”

स्थापना झाल्यापासून तीन वर्षांच्या काळात एअरॲटिक्स ने मोठी झेप घेतली आहे.  कंपनी ने आपले अस्तित्व हे भारतातील २० शहरांत वाढवले असून त्यांचे १० हजारांहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.  जुलै २०२२  मध्ये एअरॲटिक्स  ला २ कोटी रुपयांचे प्री सिरीज ए फंडिंग हे भारतीय- अमेरिकन एंजल गुंतवणूकदारांच्या नेटवर्क मधून प्राप्त झाले. एअरॲटिक्स  ने चांगली वित्तीय वाढ नोंदवली असून या आर्थिक वर्षांत उलाढाली मध्ये २५ टक्के वाढ नोंदवली आहे.

काही सेल्फ स्टोअरेज कंपन्या जसे बंगळूरु येथील माय रेंट स्पेस, हैद्राबाद येथील स्टोअरहाऊस २४ आणि मुंबईतील युवर स्पेस डॉक्टर सारख्या कंपन्यांनी एअररॲटिक्स पोर्टल वरुन आपल्या जागा नोंदवल्या आहेत.  जे ग्राहक सुरक्षित स्टोअरेज स्पेसच्या शोधात आहेत ते आता एअरॲटिक्स च्या पोर्टल वर जाऊन त्यांच्या बजेट आणि भौगोलिक गरजांनुसार पार्किंग करु शकतील. या मंचाच्या माध्यमातून पार्किंग आणि स्टोअरेज चे विविध पर्याय रियल टाईम मध्ये व किंमतीच्या माहितीसह उपलब्ध असल्यामुळे ग्राहक आता पार्किंग आणि स्टोअरेज स्पेसेस त्यांच्या गरजेनुसार निवडून बुक करु शकतात. एअरॲटिक्स कडून अधिकच्या स्टोअरेज स्पेसची जगभरांतील समस्या तसेच पार्किंगच्या गरजा पूर्ण करुन अधिक महसूल निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.

ग्राहकांना एअरॲटिक्स कडून मुल्यावर्धित सेवाही उपलब्ध करुन दिल्या जातात जसे मुव्हर्स ॲन्ड पॅकर्स, मालाचा विमा, व्हॅले पार्किंग सेवा इत्यादी या त्यांच्या पुरवठादारांकडून दिल्या जात असून त्यामुळे एअरॲटिक्स   हे ग्राहकांच्या स्टोअरेज आणि पार्किंग गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करणारे स्थळ ठरले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: