fbpx

नेहा पेंडसे आहे सहा मुलांची आई !

मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहित नाही आणि ती गोष्ट म्हणजे नेहा सहा गोंडस मुलांची आई आहे. ‘पटलं तर घ्या विथ जयंती‘ या टॉकशोमध्ये नेहाने ही गोष्ट कबूलही केली आहे. आता नेहाची ही क्युट मुलं कोण आहेत आणि हे नेमकं काय प्रकरण आहे, याचे उत्तर तुम्हाला येत्या शुक्रवारी म्हणजेच १७ मार्च रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर मिळणार आहे. नेहाने शार्दूलसोबत नरिमन पॉईंट ते नायगाव चक्क हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. आता अशा प्रवासाचे नेमके कारण काय, याचेही उत्तर तिने या टॉकशो मध्ये दिले आहे. या टॉकशोमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मेननही हजेरी लावली आहे. यावेळी त्यानेही त्याच्या आयुष्यातील एक गुपित उघड केले. ‘गल्ली बॉय’ चित्रपटातील सिद्धांत चतुर्वेदीने साकारलेल्या एमसी शेर या भूमिकेसाठी सिद्धार्थला विचारणा करण्यात आली होती. आता ती भूमिका त्याच्या हातून का सटकली, यांचा खुलासा सिद्धार्थने केला आहे. असे त्याच्या सोबत अनेकदा घडल्याचेही त्याने सांगितले.

मुळात नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन यांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री जितकी सुंदर तितकीच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही भन्नाट आहे. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉकशोमध्ये याचा अनुभव प्रेक्षकांना येईलच. यावेळी या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या शोमध्ये शेअर केल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: