fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ड्रोनआचार्य एरिअल इनोव्हेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार

पुणे : ड्रोन तंत्रज्ञानाच्या सेवा आणि सुविधा प्रदान करणारी  संस्था “ड्रोनआचार्य एरिअल इनोव्हेशन्स” यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याशी सामंजस्य करार करीत असल्याची घोषणा केली आहे. “ड्रोनआचार्य एरिअल इनोव्हेशन्स” ही नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA), भारत सरकार प्रमाणित भारतातील अग्रगण्य ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था आहे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त ज्ञान केंद्र असून ज्ञानार्जन आणि संशोधनामधील उत्कृष्ठ सेवा पुरवणाऱ्या भारतातील सर्वोच्च विद्यापीठींमध्ये यांचा समावेश केला जातो.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादिया सिंधिया यांनी असे प्रतिपादन केले आहे की येत्या काही वर्षांमध्ये जवळपास एक लाख ड्रोन पायलटची गरज आपल्याला भासणार आहे . ही अत्यंत मोठी संधी असून सदर करारामध्ये ‘एकत्रितपणे ड्रोन च्या विनियोगांवर लक्ष केंद्रित करणारे अभ्यासक्रम सुरू करणे’ हा प्रमुख उद्देश बाळगला आहे. यामध्ये DGCA प्रमाणित ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रमासोबतच ड्रोन बिल्डिंग, ड्रोन रिपेअरिंग आणि मेंटेनन्स, ड्रोन डेटा प्रोसेसिंग, ड्रोन्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट , कृषी नियोजनाकरीता ड्रोन चा वापर आणि पायथन कोडिंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. आजपर्यंत ड्रोनआचार्यने त्यांच्या पुणे केंद्रामधील पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रमाद्वारे केवळ ९ महिन्यांच्या कालावधीत २३० हून अधिक विद्यार्थ्यांना DGCA प्रमाणित ड्रोन पायलट प्रशिक्षण तसेच ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षित केले आहे. दरवर्षी २५,००० वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचे ड्रोनआचार्यचे उद्दिष्ट आहे.

विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये आणि शासकीय संस्थांमध्ये ड्रोन चा वापर आता अविभाज्य घटक बनत चालला असून अनेक अज्ञात क्षेत्रांमध्येही ड्रोन्स झेपावताना दिसत आहेत . वाढलेली कार्यक्षमता आणि उत्पादकता, कमी झालेले श्रम आणि उत्पादन खर्च, सुधारित अचूकता, पारदर्शिक सेवा , सुलभ ग्राहक संवाद आणि जागतिक दर्जाचे सुरक्षा उपाय यांचा समावेश जगभरातील ड्रोन कंपन्या सेवा पुरवताना देत आहेत . ड्रोन उद्योगाचा विस्तार झपाट्याने होत असल्याने ड्रोन उद्योगातील व्यक्तींसाठी उपलब्ध होणाऱ्या संधी ह्या वृधिंगतच होत आहेत. यामुळे तरुणांसाठी व्यवसायाचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. विशेषतः कुशल व्यावसायिकांची मागणी वाढल्याने ड्रोन संबंधित विशिष्ट प्रशिक्षण आणि शिक्षणाची गरजही वाढली आहे. ‘कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर केल्यास ५० लाख रोजगार निर्माण होऊ शकतात’ असे ऍग्रोव्हिजन प्रदर्शनाच्या समारोप समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांनी केलेले प्रतिपादन ड्रोन क्षेत्राची वाढती व्याप्ती निश्चितच अधोरेखित करते.

“ड्रोन व्यवसायक्षेत्रामधील वाढलेली लक्षणीय मागणी लक्षात घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ड्रोनआचार्य एरिअल इनोव्हेशन्स यांनी हे सहकार्याचे पाऊल उचलेले आहे . सन २०३० पर्यंत भारताला जागतिक ड्रोन केंद्र बनवण्याच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्दिष्टपूर्ती करीता संबंधित करार महत्वाचा शिलेदार बनेल असे ड्रोनआचार्य चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रतीक श्रीवास्तव यांनी सांगितले.

Leave a Reply

%d