fbpx

महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर भाजप शिष्टमंडळाची आयुक्तांशी भेट

पुणे : महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर शहर भाजपच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज आयुक्त विक‘म कुमार यांची भेट घेतली. या वेळी संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार योगेश टिळेकर, सरचिटणीय गणेश घोष, दत्ता खाडे, योगेश मुळीक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कोणतीही नवीन करवाढ करू नये, मेट्रो मार्गिका विस्तारीकरणासाठी निधी द्यावा, नवीन बसेस खरेदीला प्राधान्य द्यावे, पुण्यदशम योजना शहरभरात राबवावी, अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू करावे, आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करावे, नदी सुधारणा आणि सुशोभिकरण, कचर्‍यावर प्रकि‘या करणारे छोटे प्रकल्प उभारावेत, समाविष्ट गावांसाठी भरीव निधी द्यावा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तरतूद करावी अशा प्रमुख मागण्या वेळी करण्यात आल्याचे मुळीक यांनी पत्रकारांना सांगितले.

मुळीक म्हणाले, जी २० परिषदेच्या निमित्ताने शहरातील वारसा स्थळांचा हेरिटेज कॉरिडॉर विकसित करावा, शहराचा इतिहास, वारसा आणि परंपरांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रॅण्डिंग करण्यासाठी पोर्टल निर्माण करावे, नवीन लाइट हाऊस प्रकल्प सुरू करावेत, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय, अपंग यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणि त्यांच्या निधीत भरीव वाढ करावी अशा मागण्या या वेळी केल्या. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

मुळीक पुढे म्हणाले, गेल्या वर्षी पावसाळापूर्वीची कामे, नालेसफाई योग्य पद्धतीने करण्यात आली नाही. याबाबत प्रशासनाला वेळोवेळी सुचना केल्या होत्या. परंतु प्रशासनाने हलगर्जीपणा केला. त्यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसला होता. या वर्षी पावसाळापूर्वीची कामे १५ मार्च पासून सुरू करावीत, त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, ही कामे वेळेत पूर्ण करावीत अशी मागणी ही करण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: