fbpx

पोलीस मित्र संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसांचा सन्मान

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र संघटना,पुणे शहर तर्फे चंदननगर पोलीस स्टेशन मधील सर्व महिला अधिकारी व महिला अंमलदार यांचा पुष्पगुच्छ नारळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी चंदननगर पोलीस स्टेशन चे राजेंद्र लांडगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जगन्नाथ जानकर  पोलीस निरीक्षक (गुन्हे),सहा. पोलीस निरीक्षक खांडेकर , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संगीता काळे गोपनीय विभागाचे रवी आहेर, व सर्व महिला पोलीस अंमलदार उपस्थित होते.

यावेळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दरवर्षी पोलीस मित्र संघटनेच्या वतीने महिला पोलिसांचा करण्यात येणाऱ्या सत्कार यावरून पोलीस व त्यांच्या कार्याबद्दल किती आदर आहे ते दिसून येते असा उल्लेख करून संघटनेचे आभार मानले. सर्व सन्मान पोलीस मित्र संघटना संपर्क प्रमुख अमित सातकर, सहसचिव ललित लांडे, कामिनी ताकवले,सीमा साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्योती तुपे, सुहास तळेकर, निखिल गायकवाड, राजेश आबणावे, अमित सोनावणे,विनायक महांडुळे,करण झा,गोविंद गावडे उपस्थित होते.सर्वांचे आभार आणि स्वागत ललित लांडे यांनी केले .

Leave a Reply

%d bloggers like this: