अदानी समुहातील महाघोटाळा उघड झाल्याने सामान्य जनतेला आपला पैसा बुडण्याची भिती – अरविंद शिंदे
पुणे : .पंतप्रधान नरेंद्र मोदी – अदानी महाघोटाळ्याविरोधात व वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज एस. बी. आय. बँकेसमोर, जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती मित्र अदानी यांच्या संबंधातून अदानी समुहाला जास्तीत जास्त फायदा मिळवून दिला जात आहे. देश सध्या गंभीर आर्थिक संकटात असताना केंद्रातील भाजपा सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाचे प्रकल्प अदानी समुहाला विकण्याचा सपाटा लावला आहे. LIC आणि SBI या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये मध्यमवर्ग, नोकरदार, व सामान्य जनतेने गुंतवलेले कष्टाचे पैसे मोदी सरकारने जबरदस्तीने अदानी समुहात गुंतवायला लावले. अदानी समुहातील महाघोटाळा उघड झाल्याने आता सामान्यांचा हा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. मोदी सरकारच्या उद्योगपतीधार्जिण्या धोरणांमुळे अदानीचा महाघोटाळा उघड झाला असून जनतेचा पैसा सुरक्षित रहावा व या महाघोटाळ्याचा पर्दाफाश व्हामवा यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे.’’ या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी संजय बालगुडे, दत्ता बहिरट, अविनाश बागवे, सुनिल शिंदे, संगीता तिवारी, करणसिंग मकवाणी, छाया जाधव, संगीता क्षिरसागर, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, मुन्नाभाई शेख, विनोद रणपिसे, अमिर चौधरी, सचिन सावंत, प्रमोद निनारिया, फैय्याज मोमीन, नितीन वायदंडे, खुशाल चव्हााण आदी सहभागी झाले होते.