fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsPUNE

प्रतिकूल परिस्थितीत यश गाठणार्‍या महिलांची यशोगाथा समाजासाठी प्रेरणादायी : रेखा महाजन

पुणे – स्वतः प्रतिकूल परिस्थितीत असूनही इतरांना मदत करणेपिडितांना त्यांचे स्थान मिळवून देणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. जिद्दीच्या बळावर केलेले कार्य आणि यशस्वीतेचे गाठलेले शिखर या गोष्टी समाजासाठी प्रेरणादायी आहेतअसे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई प्रमोद महाजन यांनी केले.

कर्तृत्ववान महिलांचा वृंदावन फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महाजन यांच्या हस्ते जनाई-मुक्ताई समाजभूषण आणि जनाई-मुक्ताई समाजजागृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्या डॉ. गौतमी पवार होत्या. प्रा. सोमनाथ लांडगे, विनायकराव राउतवृंदावन फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील व्यासपीठावर होते.

उद्योजिका कमल कुंभार यांचा जनाई-मुक्ताई समाजभूषण पुरस्काराने तर पत्रकार प्रज्ञा म्हात्रेसिंधुदुर्गच्या जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरसमुख्याध्यापिका शमिका आजगांवकरयुवा अभिनेत्री अपर्णा चोथेकवयित्री स्वप्नाली देशपांडेसामाजिक कार्यकर्त्या कांचन बढेउद्योजिका वृषाली शेकदारपौर्णिमा मोहितेअ‍ॅड. नरसुबाई गदवालकरज्योती शिंदे यांचा जनाई-मुक्ताई समाजजागृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र तसेच संत चोखामेळा सार्थ अभंग गाथा असे पुरस्काराचे स्वरूप होते.

अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. गौतमी पवार म्हणाल्याआर्थिक स्वातंत्र्यसुरक्षा आणि कुटुंबाचा पाठींबा मिळाल्यानंतर महिला किती मोठी झेप घेऊ शकतात हे पुरस्कारप्राप्त महिलांच्या कार्याकडे पाहिल्यानंतर दिसून येते. समाजाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी समाजासाठीदेशासाठी काय करू शकते हा विचारच मोलाचा असतो. हा विचार कृतीत आणणार्‍या महिलांचा गौरव होत असून त्यांचे कार्य या गौरव सोहळ्यामुळे समाजासमोर येत आहे. एखादा पुरस्कार मिळाला कीसमाज जेवढ्या कौतुकाने तुमच्याकडे पाहतो तेवढीच तुमच्या कामाची अपेक्षाही वाढलेली असते. त्यामुळे आपली त्या पुरस्काराप्रतीसमाजाप्रतीमुख्य म्हणजे कामाप्रती जबाबदारी वाढते. महाराष्ट्रात संत साहित्याची परंपरा आहे. त्यात विश्वासश्रद्धात्यागसमर्पण या सार्‍यांचे प्रतिक म्हणून जनाई-मुक्ताई यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या नावे मिळणार्‍या पुरस्कारामुळे अपेक्षाही वाढतात.

कार्यक्रमाचे आयोजक सचिन पाटील यांनी रेखाताई प्रमोद महाजन यांचा सत्कार श्रीकृष्णाची मूर्ती देऊन केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी बिराजदार यांनी केले. आभार दिपाली सोनकवडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्तेश्वर मानेदेविदास बिनवडेअरुण निमकरडेविनोद सुरवसे आदिंनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: