राज्यस्तरीय अभिरुप न्यायालय स्पर्धेत ए.के. खान विधी महाविद्यालय प्रथम
पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाच्या वतीने ‘छत्रपती श्री शिवाजी महाराज राज्यस्तरीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुण्याच्या ए.के. खान विधी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर पिंपरी चिंचवडमधील बालाजी विधी महाविद्यालय स्पर्धेत उपविजेते ठरले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा व सत्र न्यायाधीश कालिदास नांदेडकर आणि सुनील वेदपाठक यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात, प्राचार्य डाॅ. विश्वनाथ पाटील,संस्थेचे सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष पद्माकर पवार, अॅड. तानाजी घारे, अॅड. सचिन शिंदे व नियामक व कारभारी मंडळ सदस्य उपस्थित होते. स्पर्धेचे हे ४ थे वर्ष आहे.
स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिके देखील देण्यात आली. यामध्ये दयानंद विधी महाविद्यालय लातूरची जेमीमा पाॅल हिने सर्वोत्तम प्रतिसादक, कराडच्या भारती विद्यापीठ न्यू विधी महाविद्यालयाची इशा गुजर हीने सर्वोत्तम अपीलकर्ता हे पारितोषिक पटकाविले. श्री शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाचा शुभम गायकवाड याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.