fbpx

रमा टिपरे, लतिका पांडव यांचा ‘स्वानंदी क्रिएशन’तर्फे तपस्या पुरस्काराने सन्मान

पुणे – आईची थोरवीमातृत्वाचे सामर्थ्य खूप मोठे आहे. आईचे प्रेमपाठबळ आणि त्यागामुळे अनेकांची वाट सुकर झाली आहे. आईच्या भक्तीत सर्व श्रेष्ठ गोष्टी सामावलेल्या आहेत परंतु सध्याच्या काळात आईच्या पावित्र्याला-मांगल्याला धक्के बसत आहेतअसे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी केले. मध्ययुगात पुरुषसत्ताक परिस्थितीमुळे स्त्रियांवर अन्याय झाले. पुरुषसत्ताक परिस्थिती उलटवून टाकण्यात जे प्रयत्न झाले त्यात महाराष्ट्र आणि मुख्यत्वे करून पुणे आघाडीवर होतेअसे उद्गार ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम यांनी काढले.

स्वत:च्या मुलांना उच्चशिक्षणाचा मार्ग दाखविणाऱ्या आणि संघ कार्यातील कार्यकर्त्यांच्या जडणघडणीत आयुष्य वेचलेल्या तळेगाव दाभाडे येथील रमा गोविंदराव (तात्या) टिपरे तसेच कीर्तन परंपरेच्या माध्यमातून मुलांवर चांगले संस्कार आणि त्यांना कलावंत म्हणून रसिकमान्यता मिळण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या पुण्यातील लतिका प्रभाकर पांडव यांचा आज (दि. 5 मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘तपस्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. गणेश सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण डॉ. माधवी वैद्य आणि मुकुंद संगोराम यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी डॉ. वैद्य आणि संगोराम बोलत होते. स्वानंदी क्रिएशन्सच्या संस्थापकप्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर आणि उद्योजक मकरंद केळकर व्यासपीठावर होते. रमा टिपरे यांच्या वतीने त्यांचे पती गोविंदराव (तात्या) टिपरे आणि कन्या अंजली डोईफोडे यांनी पुरस्कार स्वीकारला. दहा हजार रुपये रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. मानपत्राचे लिखाण अपर्णा केळकर यांनी केले आहे.

डॉ. वैद्य म्हणाल्यासामान्यातून असमान्यत्व कसे निर्मित होते हे टिपरे यांच्याविषयी जाणून घेतल्यानंतर समजले. पांडव यांनी मुलांना कलेच्या क्षेत्रात कारकिर्द घडविण्यास प्रोत्साहन दिले याचे विशेष कौतुक वाटते. आई म्हणजे वात्सल्य. हे वात्सल्य रूप मातृत्वातच नाही तर पुरुषांमध्येही दिसून येते. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेले पसायदान या मातृत्वभावनेने ओथंबलेले आहे.

संगोराम म्हणालेसमाजात स्त्रियांचे प्रमाण 50 टक्के आहे. त्या 50 टक्के स्त्रियांचा हा सन्मान आहे. त्या नसत्या तर उरलेल्या 50 टक्क्यांना शून्य किंमत आहे. त्या 50 टक्क्यांना हे लक्षात येत नाही कीखरे म्हणजे त्यांच्यामुळे आपण आहोत. स्त्री शक्तीमुळेच समाज टिकून आहे. समाजाने मुक्ताबाईजनाबाई यांना संतत्व दिले पण त्याच काळी घरातील स्त्रीला मात्र टाचेखाली ठेवले. यातून स्त्रीला बाहेर काढण्यासाठी तिला शिक्षित करणे मोलाचे ठरले. पांडव यांनी मुलांना कलेच्या प्रातांत जाऊ देण्यासाठी घेतलेला निर्णय धाडसी होता. तपस्या पुरस्कार देऊन टिपरे आणि पांडव यांचा सत्कार करून त्यांचे कार्य समाजासमोर आणल्याबद्दल स्वानंदी क्रिएशनच्या अपर्णा केळकर आणि मकरंद केळकर कौतुक.

सत्काराला उत्तर देताना पांडव म्हणाल्याकलाकार व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत उच्च पदावर पोहोचते याविषयी मी ठाम असल्यामुळे मुलांनी पूर्णवेळ कलाकार व्हावे यासाठी परवानी आणि प्रोत्साहन दिले. मुलांना ज्या विषयात आवड आहे त्याचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त करावेअसे सांगून आमच्या सारख्या महिलांची दखल घेऊन या पुरस्काराने सन्मान केला त्या बद्दल खूप आनंदीसमाधानी आहे.

तात्या टिपरे म्हणालेमाझ्या पत्नीने पडद्यामागे राहून मला मनापासून साथ दिली तिचे हे कार्य खूप मोठे आहे. तपस्या पुरस्कार मिळाल्याने आम्हाला आमच्या उतार वयातही नवी उमेदनवचैतन्य लाभले आहे. रमा टिपरे यांच्या कार्याविषयी ॲड. विद्याधर कुलकर्णी आणि निलिमा महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात अपर्णा केळकर यांनी तपस्या पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. आभार मकरंद केळकर यांनी मानले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रशांत पांडव यांचे नारदीय कीर्तन झाले. त्यांना प्रभाकर पांडव (हार्मोनियम-सहगायन)पराग पांडव (तबला)प्रणाद पांडव (टाळ) यांनी साथ केली. कलाकारांचा सत्कार मकरंद केळकर यांनी केला.

Leave a Reply

%d bloggers like this: