fbpx

‘शब्द-गान’ सांगीतिक मैफलीतून उलगडली गायकीतील सूक्ष्म सौंदर्यस्थळे

पुणे : गानतपस्वीनी मोगुबाई कुर्डिकरपंडित कुमार गंधर्वपंडित भीमसेन जोशीपंडित वसंतराव देशपांडे यांच्यासह अनेक ख्यातकीर्त गायकांच्या गायकीतील तसेच उत्तर भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील विविध घरण्यांमधील सौंदर्यस्थळे प्रसिद्ध गायक पंडित सत्यशील देशपांडे यांनी ‘शब्द-गान‘ या सांगीतिक मैफलीतून आज उलगडून दाखविली. रागसंगीत हे शब्दप्रधान नसून त्यात गायकाचे भावविश्व महत्त्वाचे असते तर बंदिशीत तत्त्वज्ञानाला महत्त्व न देता गायकीला वाव मिळणे अपेक्षित असते. गायकीत अनावश्यक बेगडी श्रृंगार नसावाअसे त्यांनी रसिकांशी संवाद साधताना सांगितले.

कै. श्रीराम (बापू) का. गोखले यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त मधुराणी गोखले-प्रभुलकर आणि अमृता गोखले-सहस्रबुद्धे यांनी ‘पितृऋण‘ या उपक्रमाअंतर्गत ‘शब्द-गान‘ या सांगीतिक मैफलीचे आयोजन केले होते. या सांगीतिक मैफलीत पंडित कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पं. सत्यशील देशपांडे यांनी विविध घराण्यांच्या गायकीची झलक दाखविली. त्यांच्याशी संगीतकार कौशल इनामदार यांनी संवाद साधला. उल्हास कुलकर्णी (तबला)सृजन देशपांडे (सहगायन) साथ केली.

पंडित कुमार गंधर्व यांच्याकडे तालिम घेण्याविषयी बोलताना देशपांडे म्हणालेकुमारजींच्या स्वरांच्या विस्तीर्ण छताखाली आश्वस्त वाटायचे. त्यांच्या गायकीतील रहस्य उकलण्यासाठीमाझी समज वाढविण्यासाठी त्यांच्याकडे शिकण्यास सुरुवात केली. संगीत शिकताना सांगीतिक क्षेत्रात अनकॉमन असणारा कॉमनसेन्सही त्यांच्याकडून शिकायला मिळाला. गुरूंनी शिक्षण दिले पण पठडीचा आग्रह न धरता विचार करायला उद्युक्त करून संगीतातील अवकाश खुले करून दिले. घराण्याची नक्कल करून गायकी टिकविण्यासाठी त्यांचा आग्रह नसायचा. कुमारजींनी आपल्याला केवळ गायनच शिकविले नाही तर जीवनातील चढ-उतारजगण्यातील नाट्यकलात्मक जगणे यांचीही ओळख करून दिली.

अभिजात्य आणि लालित्य यामधील सुवर्णमध्य दर पिढीगणिक बदलतो आहे. शास्त्रीय संगीतात गुरू अक्षरे लांबवायला परवानगी असते. स्वरांच्या आघातानुसार प्रत्येक स्वरवाक्याचा अर्थ वेगळा होतोत्यामुळे रागदारी संगीतात आघातांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक बंदिशीचा एक ठराविक कार्यकाळ असतो. रागाचे चलन न मोडता नवनिर्मिती करणे फार कठीण असतेअशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. केवळ सांगीतिक मैफल आयोजित न करता संवादात्मक सादरीकरणामुळे गायकीतील सूक्ष्म सौंदर्यस्थळे दाखविता आली या बद्दल देशपांडे यांनी गोखले कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 

सुरुवातीस मधुराणी गोखले-प्रभुलकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कलाकारांचा सत्कार डॉ. विद्या गोखले यांनी केला. 

Leave a Reply

%d bloggers like this: