fbpx

अॅक्सिस म्युचल फंडने ‘अॅक्सिस निफ्टी जी-सेक् सप्टेंबर २०३२ इंडेक्स फंड’ बाजारात आणले

मुंबई : भारतातीत सर्वाधिक तेजाने वाढणाऱ्या म्युचल फंड हाऊस पैकी एक असलेल्या अॅक्सिस म्युचल फंड (Axis Mutual Fund ) ने त्यांचा नवीन फंड (एनएफओ NFO ‘अॅक्सिस निफ्टी जी-सेक् सप्टेंबर २०३२ इंडेक्स फंड’ बाजारात आणण्याची घोषणा केली. हे एक निफ्टी जी-सेक् सप्टेंबर २०३२ इंडेक्सच्या घटकांमध्ये गुंतवणूक करणारे ओपन एंडेड टार्गेट मॅच्युरिटी डेट इंडेक्स फंड आहे. हा नव्याने बाजारात येणारा फंड श्री. आदित्य पगारिया आणि श्री. हार्दिक शहा व्यवस्थापित करतील आणि याची किमान गुंतवणूक रु. ५००० आणि त्यानंतर रु.१/- च्या पटीत आहे. याचा एक्जिट लोड काहिही नाही.

     निफ्टी जी-सेक् सप्टेंबर २०३२ निर्देशांकावर बेंचमार्क केलेले अॅक्सिस निफ्टी जी-सेक् सप्टेंबर २०३२ इंडेक्स फंडाचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट निफ्टी जी-सेक् सप्टेंबर २०३२ निर्देशांकाने दर्शविल्याप्रमाणे खर्चाच्या आधी (ट्रॅकिंग त्रुटींच्या अधीन) सिक्यूरिटीजच्या एकूण परताव्याशी संबंधित गुंतवणूक परतावा देणे ही आहे. तरीसुद्धा या योजनेचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईलच याची शाश्वती नाही.

     सरकारी सिक्यूरिटीजमध्ये (जी-सेक्) गुंतवणूक:

मुळात, सरकारी सिक्यूरिटीज किंवा जी-सेक् या ट्रेझरि बिल, फ्लोटिंग रेट बॉन्ड्स, झिरो कूपन बॉन्ड्स, कॅपिटल इंडेक्स बॉन्ड्स इत्यादीं सारख्या केंद्र सरकारने जारी केलेल्या सिक्यूरिटीज आहेत. जी-सेक् हे भारतातील डेट  बाजारातील सर्वाधिक लिक्विड साधनांपैकी एक मानले जाते.

अॅक्सिस निफ्टी जी-सेक् सप्टेंबर २०३२ इंडेक्स फंड

ही योजना तिच्या पोर्टफोलिओच्या ९५% ते १००% निफ्टी जी-सेक् सप्टेंबर २०३२ निर्देशांकातील डेट साधनांमध्ये आणि उर्वरित डेट आणि मनी मार्केट साधनांमध्ये वाटप करेल. (तपशीलवार मालमत्ता वाटप आणि गुंतवणूक धोरण कृपया एसआयडी SID पहा आणि इतर योजनांसंबंधित वैशिष्ठ्ये axismf.com वर उपलब्ध आहेत.) याशिवाय, ही योजना ‘खरेदी करा आणि धरून ठेवा’ (बाय अँड होल्ड) या गुंतवणुकीच्या धोरणाचे अनुसरण करेल, ज्यामध्ये संबंधित निर्देशांकाची डेट साधने  जर विमोचन किंवा पुनर्संतुलनासाठी विक्री केली गेली नाहीत तर मॅच्युरिटीपर्यंत ठेवली जातील.

     टार्गेट  मॅच्युरिटी फंड गुंतवणूकदारांना विशिष्ट मॅच्युरिटी बकेट्स वापरण्याची परवानगी देतात. अशा धोरणाचे पारदर्शक स्वरूप गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओ आणि साधन मिश्रणाचे स्पष्ट चित्र प्रदान करते. निष्क्रिय फंड म्हणून अॅक्सिस निफ्टी जी-सेक् सप्टेंबर २०३२ इंडेक्स फंडाचे उद्दिष्ट नामांकित निर्देशांक प्रदात्यांद्वारे तयार केलेल्या नियुक्त निर्देशांकाची प्रतिकृती बनवणे आहे. टार्गेट मॅच्युरिटी धोरणाच्या ‘मुदतपूर्तीपर्यंत ठेवणे (होल्ड टू मॅच्युरिटी) स्वरूपाचे उद्दिष्ट जे गुंतवणूकदार फंडाच्या संपूर्ण कालावधीपर्यंत गुंतवणूक ठेवतात अशा गुंतवणूकदारांची कालावधी जोखीम कमी करणे हे आहे.

या फंडाचे काही महत्त्वाचे गुणधर्म:

  • संभाव्य उत्पन्न: चलनवाढ आरबीआयच्या टॉलरन्स बॅंडमध्ये येत असल्याने आता आरबीआयची कडक उपाययोजना आणि नियंत्रण जवळपास संपत आलेले दिसत आहेत; त्यामुळे या उत्पन्न मिळण्याच्या वक्रामध्ये गुंतवणूक करण्याची ही संधी  आहे.
  • कमी किमतीची निष्क्रिय गुंतवणूक: कमी किंमतीच्या आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या उत्पादनाच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक त्रासमुक्त उपाय.
  • सिक्यूरिटी निवडीमध्ये कोणताही पक्षपात नाही: फंड निष्क्रियपणे व्यवस्थापित केल्यामुळे आणि निफ्टी जी-सेक् सप्टेंबर २०३२ इंडेक्सच्या घटकांमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे सिक्यूरिटी निवडीमध्ये कोणताही पक्षपात नाही.
  • साधे आणि सोपे: निर्देशांकाच्या फायद्यासह टार्गेट मॅच्युरिटी आणि उच्च दर्जाच्या जी-सेक् पोर्टफोलिओ.

या एनएफओच्या लॉंचबाबत बोलताना अॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रेश निगम म्हणाले, सध्याचे उत्पन्न वक्र गुंतवणूकदारांना मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीच्या भौतिक संधी देतोय. अॅक्सिस निफ्टी जी-सेक् सप्टेंबर २०३२ इंडेक्स फंड गुंतवणूकदारांना किमान डिफॉल्ट जोखमीसह उच्च दर्जाच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो. ही नवीन बाजारात आणलेली योजना अॅक्सिस म्युचल फंडाच्या निष्क्रिय डेट ऑफरिंगच्या पोर्टफोलिओमध्ये एक महत्त्वाची भर ठरेल.

न्यू फंड ऑफर (NFO) ०६ मार्च ते १३ मार्च २०२३ पर्यंत सबस्क्रिप्शन साठी खुले राहील.

अधिक माहितीसाठी कृपया www.axismf.com या संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Reply

%d bloggers like this: