fbpx

चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत कॉर्नर पॉकेट वॉरियर्स, कॉर्नर पॉकेट शुटर्स, द बॉईज संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश 

पुणे :  पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत कॉर्नर पॉकेट वॉरियर्स, कॉर्नर पॉकेट शुटर्स, द बॉईज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. (PYC-ATC Snooker Championship
 
पीवायसी हिंदु जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाने पूना क्लब अ संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. पहिल्या सामन्यात कॉर्नर पॉकेट शुटर्सच्या साद सय्यदने पूना क्लबच्या कपिल पंजाबीचा 01-56, 65-32, 11-54, 94-16, 58 (58)-00 असा पराभव करून आघाडी मिळवली. पण दुसऱ्या सामन्यात कॉर्नर पॉकेट शुटर्सच्या तहा खानला पूना क्लबच्या सूरज राठीने 40-17, 18-59, 06-42, 00-47 असे पराभुत करुन संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या लढतीत कॉर्नर पॉकेट शुटर्सच्या संकेत मुथाने अनिश केरिंगचा 43-29, 69-23, 33-26 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. 
 
कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने क्यू क्लब किलर्सचा 2-0 असा पराभव करून आगेकूच केली. विजयी संघाकडून शोएब खान, शिवम अरोरा यांनी अफलातून कामगिरी केली. द बॉईज संघाने डेक्कन टायगर्स संघाचे आव्हान 2-0 असे मोडीत काढले.
 
काल रात्री उशिरा झालेल्या कागट साखळी फेरीत ह गटात शिवम अरोरा, शोएब खान, संदीप गुलाटी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने क्यू हाऊसचा 3-0 असा पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला. ज गटात माजी जागतिक स्नुकर स्पर्धेतील विजेता लक्ष्मण रावत, भारताचा सध्याचा क्र.5 खेळाडू ध्वज हरिया, हसन बदामी यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर ड्रॅगन बॉल संघाने एमबीए यूथ क्लब संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करुन आगेकुच केली. ध्वज हरीया याने आपल्या खेळीत 6 रेड स्नुकरमध्ये सर्वाधिक 75 गुणांचा हायेस्ट ब्रेक नोंदवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप उपांत्यपूर्व फेरी:
द बॉईज वि.वि.डेक्कन टायगर्स 2-0(दिग्विजय कडीयन वि.वि.संतोष डी. 52(52)-00, 83-43, 37-00; क्रिश गुरबक्सानी वि.वि.अश्विन पलनीटकर 35-12, 56-28, 23-42, 100-25 );
 
कॉर्नर पॉकेट शूटर्स वि.वि.पूना क्लब अ 2-1 (साद सय्यद वि.वि.कपिल पंजाबी 01-56, 65-32, 11-54, 94-16, 58 (58)-00; तहा खान पराभुत वि.सूरज राठी 40-17, 18-59, 06-42, 00-47; संकेत मुथा वि.वि.अनिश केरिंग 43-29, 69-23, 33-26);
 
कॉर्नर पॉकेट वॉरियर्स वि.वि.क्यू क्लब किलर्स 2-0(शोएब खान वि.वि.अल्तमेश सैफी 53-00, 98-08, 61-21; शिवम अरोरा वि.वि.लव कुकरेजा 42-00, 65-44, 10-54, 58-48);
 
ड्रॅगन बॉल  वि.वि.ग्रीन बाईज क्लब 2-0(ध्वज हरिया  वि.वि.शिवराज मोहिते 40-15, 99(81)-13, 59-15; लक्ष्मण रावत  वि.वि.सुशांत खाडे 73(40)-00, 118(78)-04, 25-33, 117(5,62)-04);
 
गटसाखळी फेरी:
गट ह: कॉर्नर पॉकेट वॉरियर्स वि.वि.क्यू हाऊस 3-0(शिवम अरोरा वि.वि.सचित जागावकर 47-17, 103(94)-01, 63-12; शोएब खान वि.वि.अभिषेक बोरा 02-41, 76(54)-29, 62-00, 65-24; संदीप गुलाटी वि.वि. प्रसाद परांडे 47-39, 122(91)-09, 28-37, 74-41);
 
गट ज: ड्रॅगन बॉल वि.वि.एमबीए यूथ क्लब 3-0(लक्ष्मण रावत वि.वि.मयूर वाल्हेकर 39-16, 50-27, 38-28; ध्वज हरिया वि.वि.बिपीन संकपाळ 38-01, 94-02, 75(75)-00; हसन बदामी वि.वि.अजिंक्य स्वामी 42-08, 52-33, 52-07);

Leave a Reply

%d bloggers like this: