fbpx

उद्धव ठाकरेंनी मुलाला मंत्रिपद द्यायला नको होते : खासदार संजय जाधव

हिंगोली : सत्ता असतानाच अडीच वर्षाचा काळ असाच गेला. तेव्हा आम्हाला सत्तेचा लाभ व्हायला हवा होता, तो झाला नाही. याच्यासारखे दुसरे दु:ख असू शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटनेकडे लक्ष द्यायला हवे होते अथवा कोणाला तरी अधिकार द्यायला हवे होते. ते देऊ शकले नाहीत किंवा स्वत:ही लक्ष दिले नाही. तसेच तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते, तर मुलाला मंत्रिपद द्यायला नको होते. याच कारणामुळे या चोरांना संधी मिळाली, अशा शब्दांत ठाकरे गटातील परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.

आठ महिन्यांपूर्वी राज्यात मोठे राजकीय नाट्य घडले. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर जात सत्ता स्थापन केली. तसेच बहुमताच्या जोरावर शिंदे गटाला ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. यानंतर शिवसेनेला (ठाकरे गट) मोठा धक्का बसला आहे.

खा. संजय  जाधव पुढे म्हणाले की, अडीच वर्षाचा काळ असाच गेला. तेव्हा आम्हाला सत्तेचा लाभ व्हायला हवा होता, तो झाला नाही. खरे तर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते, तर पोराला मंत्री करायला पाहिजे नव्हते. पोराला मंत्री व्हायचे होते, तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होते. तुम्ही खुर्ची आटवल्याने यांना वाटले उद्या बाप गेल्यावर पोरगं माझ्या बोकांडी बसेल. त्याच्यापेक्षा वेगळी चूल मांडली, तर काय बिघडले आणि याच भूमिकेतून ही गद्दारी झाली, असेही जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: