Wednesday, May 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Big News: मनसे नेते संदीप देशपांडेवर हल्ला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे ( attack on sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकच्या वेळी ही घटना घडली. चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेटच्या स्टम्प्सने देशपांडे यांना मारहाण करण्यात आली.राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याचा संशय आहे.हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे सध्या सुखरुप असून यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे सातत्याने पक्षाची भूमिका घेत असतात. तसंच, विविध पक्षांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. आज ते सकाळी नेहमीप्रमाणे वॉकला गेले असता शिवाजी पार्कात चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. संदीप देशपांडे आज एकटेच वॉकला गेल्याने तबा धरून बसलेल्या भ्याड हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता, त्यामुळे त्यांना ओळखता आलेले नाही. मात्र, शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी तातडीने पावले उचलली असून तपास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हल्लेखोरांना लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

दरम्यान, संदीप देशपांडे यांच्या डोक्यावर क्रिकेट स्टम्पने मारहाण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, संदीप देशपांडे यांनी हा हल्ला तत्काळ उलटवून लावल्याने त्यांचे प्राण वाचले. हल्लेखोरांच्या हातापायीत संदीप देशपांडे यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मनसे नेते संतोष धुरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

हिंदुजा रुग्णालयात संदीप देशपांडे यांना भेटण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे गेले होते. प्राथमिक उपचारानंतर देशपांडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading